Murshidabad Train Accident : मुर्शिदाबादमध्ये भीषण अपघात! ट्रेन-स्कूल व्हॅनच्या धडकेत ३ विद्यार्थ्यांचा मृत्यू

मुर्शिदाबाद : पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद (Murshidabad) जिल्ह्यात शुक्रवारी सकाळी भीषण रेल्वे अपघात (Train Accident) झाला. बरहमपूर (Berhampore) परिसरात प्रवासी ट्रेनने (Passenger Train) स्कूल व्हॅनला (School Van) जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत ३ विद्यार्थ्यांचा (Students) मृत्यू झाला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास घडली. विद्यार्थी शाळेत (School) जात असताना अचानक ट्रेन आणि व्हॅनमध्ये धडक झाली. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना (Injured Students) तातडीने मुर्शिदाबाद मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल (Murshidabad Medical College and Hospital) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.



अपघाताची चौकशी सुरू, दोन रेल्वे कर्मचाऱ्यांवर कारवाई


या रेल्वे दुर्घटनेची चौकशी (Investigation) करण्यासाठी अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक (ADRM - Additional Divisional Railway Manager) यांच्या नेतृत्वाखाली १० सदस्यीय तपास पथक (Investigation Team) नियुक्त करण्यात आले आहे. दरम्यान, कामात निष्काळजीपणा (Negligence) केल्याप्रकरणी रेल्वेच्या दोन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गेटमन (Gateman) आणि सुपरवायझर (Supervisor) यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई (Strict Action) केली जाईल, असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू आहे.

Comments
Add Comment

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या

Man Ki Baat : 'मन की बात'च्या 140व्या भागातून PM नरेंद्र मोदींचा देशाला संदेश ! नशामुक्त भारतासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर भाष्य

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या मासिक रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’च्या १४०व्या भागातून

Medicare Rules : अमेरिकेत 3 लाख कायदेशीर स्थलांतरितांना मोठा धक्का ! ट्रम्प सरकारचा मेडिकेअरबाबत नवा नियम

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प सरकारने मेडिकेअर या सरकारी आरोग्य विमा योजनेच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. या