Aadhaar App : आधार ॲपने ओलांडला ४ कोटी डाउनलोड्सचा टप्पा

नवी दिल्ली : आधार ॲपने 4 कोटी डाउनलोड्सचा एक महत्त्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. यातून नागरिकांचा सोयीस्कर आणि डिजिटल ओळख सेवांवरील वाढता विश्वास अधोरेखित होतो. आधार ॲपचा वाढता वापर हे घरबसल्या पत्ता अपडेट करणे, मोबाईल नंबर अद्ययावत करणे, ईमेल अद्ययावत करणे, बायोमेट्रिक लॉक/अनलॉक तसेच ई-आधार डाउनलोड करणे यांसारख्या आधार-संबंधित विविध सेवा मिळवण्यासाठी एक-स्टॉप डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून उदयास आले आहे. (Aadhaar App)


ॲपचा प्रारंभ झाल्यापासून, आधार ॲपने 11.65 लाख जणांना पत्ते अद्ययावत करण्याची सुविधा दिली, त्यामुळे नागरिकांना आधार केंद्राला भेट न देता सोयीस्करपणे त्यांचे आधार तपशील अद्ययावत ठेवता येणार आहेत. या ॲपने सुमारे 49 लाख मोबाईल नंबर अद्ययावत करण्याची सुविधा दिली, ज्यामुळे नागरिकांना त्यांच्या आधारशी जोडलेली अचूक संपर्क माहिती राखण्यास मदत मिळाली. (Aadhaar App)



1 जुलै रोजी ईमेल अपडेट फीचर सुरू झाल्यापासून, आधार ॲपद्वारे सुमारे 12.5 लाख ईमेल ॲड्रेस जोडले किंवा अपडेट केले आहेत. परिणामी आवश्यकतेनुसार नागरिक आणि भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) यांच्यातील संवाद अधिक मजबूत झाला आहे. यापूर्वी या सुविधेसाठी 75 रुपये शुल्क आकारले जात होते. मात्र, आधार ॲप वर ही सुविधा 31 डिसेंबर 2026 पर्यंत विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Aadhaar App)



या ॲपच्या गोपनीयता आणि सुरक्षा सुविधेचा वापरही मोठ्या प्रमाणावर होत आहे. नागरिकांनी बायोमेट्रिक लॉक/अनलॉक सुविधेचा वापर 19.1 कोटी पेक्षा जास्त वेळा केला आहे. ही सुविधा, आधार क्रमांक धारकांना त्यांची वैयक्तिक माहिती अधिक सुरक्षित ठेवण्याची हमी देते. नागरिक आवश्यकतेनुसार त्यांचे बायोमेट्रिक्स त्वरित लॉक किंवा अनलॉक करू शकतात आणि केवळ काही टॅप्सद्वारे सुरक्षा वाढवता येतो. (Aadhaar App)

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात