Shashi Tharoor : लिफ्टमध्ये अडकले शशी थरूर; १५ मिनिटांनंतर अग्निशमन दलाने केली सुटका

तिरुवनंतपुरम : काँग्रेसचे खासदार (Congress MP) शशी थरूर (Shashi Tharoor) शुक्रवारी संध्याकाळी केरळमधील (Kerala) एका हॉटेलच्या लिफ्टमध्ये (Lift) अडकले. तब्बल १५ मिनिटे लिफ्टमध्ये अडकल्यानंतर अग्निशमन आणि बचाव पथकाने (Fire and Rescue Team) त्यांची सुरक्षित सुटका (Rescue) केली.


शशी थरूर एका कार्यक्रमासाठी हॉटेलमध्ये पोहोचले होते. त्यावेळी तांत्रिक बिघाडामुळे (Technical Glitch) लिफ्ट अचानक बंद पडली आणि ते त्यामध्ये अडकले. घटनेची माहिती मिळताच तिरुवनंतपुरम अग्निशमन विभागाला (Fire Department) संध्याकाळी ७:३७ वाजता याबाबत कळवण्यात आले.



माहिती मिळताच अग्निशमन कर्मचाऱ्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला लोखंडी रॉडच्या (Iron Rod) मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यात यश आले नाही. त्यानंतर हायड्रॉलिक टूल्स (Hydraulic Tools) आणि स्प्रेडरच्या (Hydraulic Spreader) मदतीने लिफ्टचा दरवाजा उघडण्यात आला.





लिफ्टचा दरवाजा कटरने (Cutter) कापून केली सुटका


संध्याकाळी सुमारे ७:५१ वाजता शशी थरूर यांच्यासह लिफ्टमध्ये अडकलेल्या इतर लोकांनाही बाहेर काढण्यात आले. लिफ्ट ठरलेल्या मजल्यावर (Floor) पूर्णपणे पोहोचली नसल्याचे सुटकेनंतर समोर आले. बाहेर आल्यानंतर शशी थरूर हसतमुख दिसले. त्यांनी बचाव पथकाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. "तुम्ही खूप चांगले काम केले," असे म्हणत त्यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.



शशी थरूर यांनी सांगितला लिफ्टमधील अनुभव


शशी थरूर यांनी सांगितले की, सुरुवातीला हॉटेलच्या लिफ्ट मेकॅनिकला (Lift Mechanic) बोलावण्यात आले होते. मात्र त्यांना लिफ्ट सुरू करण्यात यश आले नाही. त्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनीही प्रयत्न केले, पण मदत न झाल्याने अग्निशमन विभागाला बोलावण्यात आले. थरूर म्हणाले की, "अग्निशमन आणि बचाव सेवेबद्दल (Fire and Rescue Service) माझे आधीपासून चांगले मत आहे. अधिकाऱ्यांनी अतिशय उत्कृष्ट काम केले. ते काही मिनिटांत घटनास्थळी पोहोचले." सुटकेनंतर थरूर यांनी अग्निशमन कर्मचाऱ्यांना चहा घेण्याची (Tea) विनंती केली. मात्र कर्मचाऱ्यांनी नम्रपणे नकार देत त्यांच्याशी हस्तांदोलन (Handshake) करून तेथून निघून गेले.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात