FIFA World Cup 2026 : अंतिम सामन्यात अर्जेंटिना-स्पेन आमने सामने; ९६ वर्षांनंतर स्पॅनिश भाषिक देशांमध्ये ऐतिहासिक फायनल सामना

न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात लढत होणार आहे. हा सामना केवळ विजेतेपदासाठी नाही, तर भाषा, संस्कृती आणि ऐतिहासिक नात्यामुळे लाखो चाहत्यांसाठी भावनिक ठरणार आहे.स्पेन आणि अर्जेंटिना या दोन्ही देशांची अधिकृत भाषा स्पॅनिश आहे. दोन्ही देशांतील सांस्कृतिक आणि कौटुंबिक संबंध काही काळापासून भक्कम आहेत. त्यामुळे अनेक कुटुंबं अशी आहेत, ज्यांना कुणाला पाठिंबा द्यायचा हा प्रश्न पडला आहे. (FIFA World Cup 2026)



अर्जेंटिनाची राजधानी ब्यूनस आयर्समध्ये राहणारे स्पेनमध्ये जन्मलेले अनेक नागरिक या सामन्यामुळे दोन्ही संघाना पांठिबा देत असल्याचे दिसत आहे. काहींनी मन स्पेनसोबत असले तरी अर्जेंटिना जिंकला तरी आनंदच होईल, अशा भावना केल्या आहेत. स्पेन आणि अर्जेंटिनाचे नाते केवळ भाषेपुरते मर्यादित नाही. १६ व्या शतकात स्पेनमधून मोठ्या प्रमाणात नागरिक अर्जेंटिनाला स्थायिक झाले होते. त्यामुळे दोन्ही देशांच्या संस्कृतीत समानतेचा एक धागा दिसत आहे.(FIFA World Cup 2026)



साहित्य, संगीत, खाद्यसंस्कृती आणि फुटबॉलमुळे दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले. अल्फ्रेडो डी स्टेफानो आणि लिओनेल मेस्सीसारख्या दिग्गज खेळाडू या नात्याला आणखी नवीन ओळख मिळवून देत आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात स्पेन आणि अर्जेंटिना यांच्यात यापूर्वी केवळ एकदाच सामना झाला होता. १९६६ च्या विश्वचषकात अर्जेंटिनाने स्पेनचा पराभव केला होता. आता प्रथमच दोन्ही संघ अंतिम फेरीत विजेतेपदासाठी भिडणार आहेत.१९३० नंतर प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दोन स्पॅनिश भाषिक देश आमनेसामने येत आहेत. त्यामुळे हा सामना केवळ ट्रॉफीसाठी नसून इतिहास, संस्कृती आणि भावनांचा संगम ठरणार आहे. सोशल मीडियावरही स्पेन आणि अर्जेंटिना समर्थक कुटुंबांचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या ऐतिहासिक सामन्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. (Argentina vs Spain)



संभाव्य-११


स्पेन : (4-2-3-1): सायमन (गोलकीपर); पोरो, क्यूबर्सी, लापोर्टे, कुकुरेला; रॉड्रि, रुईझ; यमल, ओल्मो, बायना; ओयरझाबल


अर्जेंटिना : (4-1-3-2): मार्टिनेझ (गोलकीपर); मोलिना, रोमेरो, लिसांड्रो, टॅगलियाफिको; परदेस; डी पॉल, फर्नांडीझ, मॅक ॲलिस्टर; मेस्सी, अल्वारेझ

Comments
Add Comment

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

ENG vs PAK Test Match : लॉर्ड्सवर पाकिस्तानचा ‘काळा दिवस’; १९४ धावांत ऑलआऊट, WTC फायनलच्या शर्यतीतून बाहेर!

लॉर्ड्स : इंग्लंडविरुद्धच्या लॉर्ड्स कसोटीत पाकिस्तानला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. ३८९ धावांच्या

Kagiso Rabada : कागिसो रबाडा ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकण्याची शक्यता

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेच्या सुरुवातीपूर्वी दक्षिण आफ्रिकेला मोठा धक्का बसला आहे.

Roger Federer : रॉजर फेडररचा 'टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश

नवी दिल्ली : ऱ्होड आयलंडमधील न्यूपोर्ट येथे 'इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश होताना २० वेळा ग्रँडस्लॅम