Dharmendra Pradhan Met Amit Shah : दिल्लीतल्या हालचालींना वेग! धर्मेंद्र प्रधान गृहमंत्र्यांच्या भेटीला पोहोचले, पदाचा राजीनामा देणार?

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजधानी दिल्लीत मोठा राजकीय गोंधळ निर्माण झाला. 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) ने संसदेवर मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर जंतरमंतर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दिल्ली पोलिसांनी आंदोलकांना जंतरमंतरपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या केरळ भवनापर्यंतच मोर्चाची परवानगी दिली. मात्र, यावरून आंदोलक आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला आणि परिस्थिती चिघळल्यानंतर शीघ्र कृती दलाच्या (RAF) जवानांनी आंदोलकांवर लाठीमार केल्याची घटना घडली. (Dharmendra Pradhan Met Amit Shah)


या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. या भेटीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष लक्ष लागले आहे. (Dharmendra Pradhan Met Amit Shah)



दरम्यान, CJP च्या आंदोलनातील प्रमुख मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आहे. या मागणीमागे कथित NEET पेपरफुटी प्रकरणाचा संदर्भ दिला जात असल्याने प्रधान आणि अमित शाह यांची भेट राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जात आहे. संसदेकडे मोर्चा सुरू असतानाच प्रधान गृहमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने ते राजीनामा देणार का, याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. (Dharmendra Pradhan Met Amit Shah)



दरम्यान, दिल्लीतील आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि अमित शाह-धर्मेंद्र प्रधान यांच्या भेटीमुळे संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. (Dharmendra Pradhan Met Amit Shah)

Comments
Add Comment

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर