IIT Roorkee : 'राजकीय आंदोलनांना सोशल मीडियावर पाठिंबा देऊ नका'; IIT च्यामोठ्या निर्णयाची देशभरात चर्चा

रुडकी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी जारी केलेल्या एका अंतर्गत सर्क्युलरमुळे मोठी चर्चा रंगली आहे. या सर्क्युलरमध्ये सोशल मीडियावर कोणत्याही राजकीय आंदोलनाला किंवा राजकीय भूमिकेला पाठिंबा दर्शवू नये, तसेच सार्वजनिक राजकीय वक्तव्ये करण्यापासून दूर राहावे, असा सल्ला देण्यात आला आहे. हे सर्क्युलर सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी त्यावर टीका केली असून काहींनी याला 'तोंड बंद करण्याचा आदेश' असेही म्हटले आहे. (IIT Roorkee)



विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सर्क्युलर :


दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर देशातील विविध भागांतही विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. या पार्श्वभूमीवर IIT रुडकी प्रशासनाने विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अंतर्गत सूचना जारी केल्या. त्यामध्ये संस्थेशी संबंधित कोणत्याही व्यक्तीने सोशल मीडिया किंवा इतर सार्वजनिक व्यासपीठांवर राजकीय भूमिका मांडू नये किंवा कोणत्याही राजकीय आंदोलनाला पाठिंबा दर्शवू नये, असे नमूद करण्यात आले आहे. (IIT Roorkee)



'सार्वजनिक राजकीय वक्तव्यांना परवानगी नाही' :


सर्क्युलरमध्ये असेही नमूद करण्यात आले आहे की, काही विद्यार्थी आणि कर्मचारी इंस्टाग्राम, फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्याच्या राजकीय आंदोलनांबाबत सार्वजनिक भूमिका आणि टीका करत असल्याचे निदर्शनास आले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले की, IIT ही शैक्षणिक आणि संशोधन संस्था असून विद्यार्थ्यांचे प्रवेश आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती अभियांत्रिकी, विज्ञान, तंत्रज्ञान आणि संशोधन क्षेत्रातील ज्ञानवृद्धीसाठी केली जाते. त्यामुळे सोशल मीडिया, प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे सार्वजनिक राजकीय वक्तव्ये करणे किंवा राजकीय उपक्रमांमध्ये सहभागी होणे संस्थेच्या आचारसंहितेच्या विरोधात असल्याचे सर्क्युलरमध्ये म्हटले आहे. (IIT Roorkee)



'हा नवा नियम नाही' – IIT प्रशासनाचा खुलासा : 


सर्क्युलरवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाल्यानंतर IIT रुडकी प्रशासनाने याबाबत स्पष्टीकरण दिले. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, अशा प्रकारची अंतर्गत सल्लागार सूचना (Advisory) प्रत्येक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना दिली जाते. ही सूचना संस्थेच्या विद्यमान आचारसंहितेचा भाग असून यात कोणताही नवीन नियम किंवा धोरण लागू करण्यात आलेले नाही. प्रशासनाने या सर्क्युलरकडे संदर्भाबाहेर पाहू नये, असेही स्पष्ट केले आहे. (IIT Roorkee)



सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया : 


हे सर्क्युलर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. काहींनी संस्थेच्या शिस्तीच्या दृष्टीने या सूचनांचे समर्थन केले आहे, तर काहींनी विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न असल्याची टीका केली आहे. त्यामुळे IIT रुडकीचे हे सर्क्युलर सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. (IIT Roorkee)

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा