NEW DELHI : आमच्यावर विटा आणि कुंडी फेकून मारल्या , जखमी दिल्ली पोलिसांनी दिली माहिती

नवी दिल्ली : संसदेजवळ झालेल्या हिंसाचारादरम्यान आंदोलकांनी जवळच असलेल्या एका संरचनेचा काही भाग तोडून विटा गोळा केल्या आणि त्या विटा व फुलांच्या कुंड्या पोलिसांवर भिरकावल्या, असा गंभीर आरोप जखमी दिल्ली पोलिसांचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (ASI) दत्तात्रय दराडे यांनी मंगळवारी केला. गर्दीमध्ये 'असामाजिक घटक' उपस्थित असल्याचा दावाही त्यांनी केला.


डोक्याला झालेल्या दुखापतीवर उपचार घेत असताना एएनआयशी बोलताना, एसीपी-१, डीसीपी रिझर्व्ह येथे कार्यरत असलेले एएसआय दराडे म्हणाले की, पोलिसांनी आंदोलकांना वारंवार शांतता राखण्याचे आवाहन केले होते आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू असल्याची माहिती दिली होती.



एएसआय दत्तात्रय दराडे यांनी सांगितलेला घटनाक्रम


बॅरिकेट्स तोडले: "मी एसीपी-१, डीसीपी रिझर्व्हमध्ये तैनात आहे. जंतरमंतर येथील बॅरिकेट्सच्या पहिल्या ओळीवर माझी नियुक्ती करण्यात आली होती. हळूहळू सुमारे ८,००० ते १०,००० लोकांची प्रचंड गर्दी जमा झाली. आम्ही त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आणि कलम १६३ लागू असल्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिला," असे ते म्हणाले.


दगडफेक आणि तोडफोड: "त्यांनी आमचे ऐकले नाही आणि पहिले व दुसरे बॅरिकेट्स बळाचा वापर करून तोडले. जेव्हा ते संसद मार्ग पोलीस स्टेशनजवळील तिसऱ्या थरापर्यंत पोहोचले, तेव्हा त्यांनी जोरदार दगडफेक सुरू केली. विटा म्हणून वापर करण्यासाठी त्यांनी एका जवळच्या इमारतीची भिंतही पाडली आणि आमच्यावर फुलांच्या कुंड्या फेकल्या." "या गोंधळादरम्यान गर्दीतून फेकलेला एक दगड माझ्या डोक्याला लागला. सहकाऱ्यांनी मला पीसीआर व्हॅनमधून राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात नेले. माझ्या डोक्याला दोन टाके पडले असून डॉक्टरांनी औषधोपचार केले."



असामाजिक घटकांचा सहभाग


वातावरण अत्यंत आक्रमक होते. ते केवळ विद्यार्थी होते असे मला वाटत नाही; त्यांच्यामध्ये असामाजिक घटकही होते ज्यांनी पोलिसांच्या कोणत्याही सूचनेकडे लक्ष दिले नाही. केवळ माझ्या परिसरातच इतर ८ ते १० पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत."



हेड कॉन्स्टेबल नवीन भोला यांची प्रतिक्रिया


डीबीजी रोड पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले हेड कॉन्स्टेबल नवीन भोला हेदेखील संसद मार्ग पोलीस ठाण्याजवळील हिंसाारात दगडफेकीत डोक्याला दुखापत झाल्यामुळे जखमी झाले आहेत. २० जुलै रोजी संसद मार्ग पोलीस स्टेशनसमोर आपली ड्युटी होती, असे सांगताना ते म्हणाले, "आम्ही जनता, मुली, मुले सर्वांना सहकार्य करत त्यांना मागे सरकवण्याचा प्रयत्न करत होतो. अचानक गर्दी अनियंत्रित आणि आक्रमक झाली आणि त्यांनी आमच्यावर दगडफेक सुरू केली. माझ्या डोक्याला मार लागला." आरएमएल रुग्णालयातून प्राथमिक उपचार व तीन टाके घेतल्यानंतर त्यांना रात्री ११ वाजता डिस्चार्ज देण्यात आला असून डॉक्टरांनी त्यांना १० ते १५ दिवस विश्रांतीचा सल्ला दिला आहे सोमवारी दिल्ली पोलिसांनी कनॉट प्लेस परिसरातील दगडफेकीचे कथित व्हिडिओ जारी केले होते. दरम्यान, NEET-UG २०२६ च्या कथित पेपर लीक प्रकरणावरून CJP (कॉकरोच जनता पार्टी) चे आंदोलन सोमवारी हिंसक झाले होते, ज्यामध्ये निदर्शकांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला होता.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी