Pune Crime :पुणे हादरलं! दीड वर्षाचा असताना वडिलांची हत्या करणार्‍यांना मुलाने २३ वर्षांनंतर संपवलं

पुणे : पुण्यातील शिंदेवाडी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलगा अवघ्या दीड वर्षांचा असताना त्याच्या वडिलांची निर्घृण हत्या करणाऱ्यांना अनाथ झालेल्या मुलाने २३ वर्षांनंतर संपवलं. हे सगळं एखाद्या हिंदी चित्रपटाची गोष्ट वाटत आहे ना ? पण हे असचं पुण्यातील शिंदेवाडी परिसरात घडलं आहे. (Pune Crime)



हत्या करणाऱ्या मुलाचे नाव मंथन वैद्य आहे. लहान असताना आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या आरोपींना मंथन आणि त्याच्या तीन साथीदारानी मिळून संपवलं. या प्रकरणी पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंथन आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. ही हत्या का करण्यात आली याचे कारण ऐकलं तर एखादा हिंदी चित्रपट नक्कीच आठवेल.मंथनच्या वडिलांची हत्या झाली तेव्हा तो फक्त दीड वर्षांचा होता. वडिलांच्या हत्येनंतर त्याच्या आईने घर आणि मुलाला सांभाळलं. पुण्यातील सदाशिव पेठेत एक खानावाळीचा व्यवसाय तिने सुरू केला. मात्र दुसर्‍या बाजूला वडिलांच्या हत्येप्रकरणात कोर्टात केस सुरू होती. मंथनने आपल्या वडिलांची हत्या करणाऱ्या संजय देशमुख याचा काटा काढण्याचा निर्णय घेतला होता.




२३ वर्षांची बदल्याची आग अखेर शांत


एप्रिल २०२६ मध्ये संजय देशमुख जेलमधून जामिनावर बाहेर आला. त्याच्यावर एकूण तीन गुन्हे दाखल होते .त्याच वेळी मंथनने त्याचा गेम करण्याचं ठरवलं होते. देशमुख आणि मंथनच्या मावशीचा नवरा संदीप कोरी यांची भेट झाली. यावेळी मंथन आपला खून करणार असल्याचं संजयला समजलं. संजयने संदीप कोरीच्या माध्यमातून मंथनला धमकावून बघितले पण काहीही परिणाम झाला नाही. (Shindewadi)



संजय देशमुख ११ जुलै रोजी पुण्यातील मुंढवा भागातून कात्रजच्या दिशेने जात होता. त्यावेळी मंथन आणि त्याचे दोन मित्र तसेच संदीप कोर यांनी देशमुखचा पाठलाग केला. मंथनने संजयची कार कात्रज बोगद्याजवळ अडवत धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.याप्रकरणी राजगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी घटनेचा तपास करत सीसीटीव्ही फूटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे मंथन दिनेश वैद्य आणि सौरभ सागर परदेशी या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत मंथनने कबूल केले की, मियान गज्जद्दीन शेख आणि संदीप कोरी यांच्या मदतीने ही हत्या केली. पोलीस तपासात उघडकीस आले की जुन्या वैमनस्यातून सूड उगवत ही हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी आता पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Comments
Add Comment

Unknown Calls Block Scheme : खूशखबर! फसव्या कॉल्सची आता खैर नाही; केंद्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय!

नवी दिल्ली : अनोळखी (Unknown) नंबरवरून येणारे फेक कॉल्स आणि सायबर फसवणुकीच्या त्रासाला आता कंटाळलात का? तर तुमच्यासाठी

Milind Soman Fitness : वयाच्या 60 व्या वर्षीही फिटनेस जबरदस्त! मिलिंद सोमण यांचा 15 मिनिटांचा वर्कआउट आणि फिटनेस मंत्र

Milind Soman Fitness Routine : वयाच्या ६० व्या वर्षीही उत्तम फिटनेस आणि उत्साह कायम ठेवणारे अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण

Nashik Crime : नराधमाला फाशीच ! डोंगराळे बालिका अत्याचार व हत्या प्रकरणात विजय खैरनारला फाशीची शिक्षा, जलदगती न्यायालयाचा मोठा निकाल

Nashik Crime : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील साडेचार वर्षांच्या बालिकेवरील लैंगिक अत्याचार आणि

Mobile New Rules: Truecaller शिवाय कळणार अनोळखी कॉल कोणाचा! 1 नोव्हेंबरपासून मोबाईलवर दिसणार कॉल करणाऱ्याचं नाव

Mobile New Rules: मोबाईलवर अनोळखी नंबरवरून कॉल आल्यास तो नेमका कोणाचा आहे, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण Truecaller सारख्या अ‍ॅपचा

Jio Platforms IPO : रिलायन्सचा मोठा निर्णय; Jio IPO प्राईस बँड जाहीर, भागधारकांना विशेष लाभ!

Jio Platforms IPO: मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीजची डिजिटल आणि टेलिकॉम कंपनी जिओ प्लॅटफॉर्म्सचा

प्रेमासाठी काय पण ! 75 वर्षीय रामसुगर 30 वर्षांच्या रानी राजपूतशी बांधणार लग्नगाठ, साखपुड्याचा व्हिडीओ व्हायरल

उत्तर प्रदेश : प्रेमाला वयाचं बंधन नसतं, असं म्हटलं जातं. उत्तर प्रदेशातील औरैया जिल्ह्यातील एका अनोख्या