NEET TOPPER : नीट २०२६ टॉपर आर्यन गुप्ताची विशेष मुलाखत; प्रोटेस्टवर मला काहीच बोलयचं नाही, पण...

Panjab : NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी तब्बल ७१५ गुण मिळवून ऑल इंडिया रँक-१ (AIR 1) पटकावणारा पंजाबचा आर्यन गुप्ता हा सध्या सर्वत्र चर्चेत आहे. देशभरात सुरू असलेले NEET पेपर लीक प्रकरण आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान (Protest) त्याला एका मुलाखतीत यावर प्रश्न विचारण्यात आला. या वादावर प्रतिक्रिया देण्याऐवजी आर्यनने अतिशय समजदारीने यावर बोलणे टाळले.




आंदोलनावर काय म्हणाला आर्यन?


आंदोलनाबद्दल विचारले असता आर्यन गुप्ता म्हणाला, "यावर कमेंट करण्यासाठी मी खूप लहान आहे, मला यावर काहीही बोलायचे नाही."





मात्र, जेव्हा त्याला पेपर लीक आणि परीक्षा रद्द झाल्याच्या प्रसंगाबद्दल विचारण्यात आले, तेव्हा त्याने आपली मनःस्थिती मोकळेपणाने मांडली. तो म्हणाला, "सुरुवातीला मला खूप निराशा आली होती. जेव्हा पेपर रद्द झाला, तेव्हा माझे मन खचले होते आणि मी खूप रडलोही होतो. पण नंतर मला जाणीव झाली की जे झाले ते अन्यायकारक असले तरी, ते केवळ माझ्या एकट्यासोबत घडले नाही. माझ्यासारख्या इतर २२ लाख विद्यार्थ्यांनीही तीच वेदना सहन केली आणि ते पुन्हा परीक्षा देत आहेत. मला पुन्हा एक संधी मिळाली आहे, हे ध्यानात घेऊन मी स्वतःला सावरले आणि दररोज आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला."




अपयशावर मात कशी केली?


आर्यनने सांगितले की, "मी दुसऱ्याच दिवसापासून पुन्हा अभ्यास सुरू केला आणि आज त्याचाच परिणाम तुमच्या समोर आहे. हे यश आणि माझी ही रँक माझ्या आई-वडील, मोठा भाऊ आणि शिक्षकांच्या पाठिंब्याशिवाय शक्य नव्हती. माझे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत, त्यांनी माझी पायाभरणी मजबूत केली आणि या कठीण काळात मला खूप मोठा भावनिक आधार दिला."




आगामी काळातील विद्यार्थ्यांसाठी मोलाचा सल्ला


भविष्यात परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना संदेश देताना NEET टॉपर आर्यन म्हणाला, "पुढील परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मी एवढेच सांगेन की, आपल्या शिक्षकांवर पूर्ण विश्वास ठेवा आणि त्यांचे मार्गदर्शन डोळे बंद करून स्वीकारा, कारण ते आपल्यापेक्षा खूप काही जाणतात. दररोज आपले बेस्ट द्या, शिस्त (Discipline) आणि सातत्य (Consistency) राखून सातत्याने मेहनत करत राहा; बाकी सर्व काही आपोआप मार्गी लागेल."

Comments
Add Comment

Tamil nadu crime news : तमिळनाडू हादरले! पाण्याच्या टाकीत आढळले महिलेचे छिन्नविच्छिन्न अवशेष; दागिन्यांच्या चोरीसाठी हत्येचा संशय

सेलम : तमिळनाडूतील सेलम (Taamilnadu Crime News) जिल्ह्यात एक अत्यंत भयानक आणि मन सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. घराच्या छतावर

IndiGo Emergency Landing : गोवा-दिल्ली इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग; इंजिनमध्ये बिघाड झाल्याने २२९ प्रवाशांचा जीव टांगणीला

गोवा : गोव्याहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो (IndiGo) एयरलाइन्सच्या विमानाचे मंगळवारी सकाळी गोवा विमानतळावर तातडीने

Nepal green house miracle : नेपाळमधील महापुरात सर्वकाही वाहून गेले; पण ४० वर्षे जुने 'हिरवे घर' कसे टिकून राहिले ? घरमालकाने सांगितली आपवीती

काठमांडू : "जेव्हा तुम्हाला वाटतं की हे तुमच्या आयुष्याचे शेवटचे क्षण आहेत, तेव्हा डोक्यात काय विचार येऊ शकतात?

Gold Silver Rate Today : PM मोदींचे 'ते' आवाहन अन् सोन्या-चांदीचे भाव गडगडले! चांदी थेट 'इतक्या' हजारांनी स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

मुंबई : परदेशी चलनावरील वाढता दबाव कमी करण्यासाठी आणि देशांतर्गत बाजारपेठेत संतुलन राखण्यासाठी पंतप्रधान

Uzbekistan 30 Days Visa Free Entry : भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर! उझबेकिस्तानमध्ये ३० दिवस व्हिसामुक्त प्रवास

नवी दिल्ली : परदेशात फिरण्याचा प्लॅन करणाऱ्या भारतीय पर्यटकांसाठी मोठी खुशखबर आहे. उझबेकिस्तानने भारतीय

PM Selfie Video : भारताचा विकास दर ७.८%; पंतप्रधान मोदींकडून नागरिकांचे अभिनंदन, म्हणाले- ‘ही आपल्या सामूहिक शक्तीची ओळख’

नवी दिल्ली : भारताने आर्थिक विकासाच्या बाबतीत दमदार कामगिरी करत आर्थिक वर्ष २०२७ च्या पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के