Sharad Pawar : विरोधकांच्या रणनीतीदरम्यान शरद पवार-सुप्रिया सुळे यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा वातावरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे. विरोधी पक्ष सरकारला घेरण्याच्या तयारीत असतानाच झालेल्या या भेटीमुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत. (Sharad pawar)


मात्र, या भेटीचा मुख्य उद्देश महाराष्ट्रातील शेती, सिंचन आणि जल व्यवस्थापनाशी संबंधित प्रश्न मांडणे हा असल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधानांना पत्र देत शेतकरी आणि ग्रामीण भागाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांकडे लक्ष वेधले. (Supriya Sule)


 


पत्रात शेतकरी आत्महत्याग्रस्त ( Agriculture) कुटुंबांना मिळणारी आर्थिक मदत तातडीने देण्यासाठी प्रक्रिया सुलभ करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्या मदत मंजूर होण्यास मोठा विलंब होत असल्याने डिजिटल पडताळणी करून थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्याची सूचना करण्यात आली आहे.



याशिवाय, जल जीवन मिशन (Jal Jivan Mission) आणि सिंचन प्रकल्पांमध्ये झालेल्या विलंबाची स्वतंत्र संस्थेमार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. अनेक प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार, निष्काळजीपणा आणि प्रशासकीय अडथळ्यांमुळे कामे रखडल्याचा मुद्दा पत्रात उपस्थित करण्यात आला आहे.


शेतकऱ्यांना सर्व पिकांसाठी किमान आधारभूत किंमतीची (MSP) कायदेशीर हमी देण्याचीही मागणी करण्यात आली. महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांना सरकारी दराने पिकांची खरेदी होत नसल्याने त्यांना कमी दरात माल विकावा लागत असल्याचे पवार यांनी नमूद केले.



पीक विमा योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी जिओ-टॅगिंग आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर अनिवार्य करण्याची तसेच बनावट बियाण्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन एनडीआरएफच्या भरपाईच्या निकषांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.


Comments
Add Comment

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात