PM Narendra Modi : शरद पवार-मोदी भेटीमुळे तर्कवितर्कांना उधाण

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी संसदेतील पंतप्रधान कार्यालयात (पीएमओ) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Narendra Modi) भेट घेतली. या अचानक झालेल्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे. दिल्लीत 'नीट' पेपरफुटीविरोधात सुरू असलेले विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत ही भेट झाल्याचे सांगितले जात असले, तरी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींची पार्श्वभूमी या भेटीला असल्याचे कळते. ( PM Narendra Modi)



संसदेतील पंतप्रधान कार्यालयात झालेल्या या भेटीची काही छायाचित्रे समोर आली असून, त्यामध्ये पंतप्रधान मोदी ( Sharad Pawar Modi Meeting) हे हसतमुखाने शरद पवार यांचे स्वागत करताना आणि गप्पा मारताना दिसत आहेत. मंगळवारीच शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी जंतर-मंतरवर जाऊन अभिजीत दिपके यांच्यासह आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर, केंद्र सरकार आणि आंदोलक विद्यार्थ्यांमधील गतिरोध दूर करण्यासाठी शरद पवार यांनी पुढाकार घेतला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 'नीट' पेपरफुटीप्रकरणी मार्ग काढणे आणि भविष्यातील उपाययोजनांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.



खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले पत्र



दरम्यान, या भेटीदरम्यान शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी यांना राज्यातील कृषी आणि जलक्षेत्रातील परिस्थितीबाबत पत्र सुपूर्द केले. महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, बाधित कुटुंबांना आर्थिक मदत द्यावी आणि मानसिक आरोग्य सहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सिंचन प्रकल्पांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी 'थर्ड पार्टी ऑडिट' करावे, रखडलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत आणि केवळ किमान आधारभूत किंमत (एमएसपी) जाहीर न करता शेतकऱ्यांना 'एमएसपी'चा कायदेशीर अधिकार द्यावा, या मुद्द्यांकडे पत्रातून लक्ष वेधण्यात आले आहे. याशिवाय, पीकविमा योजनेतील त्रुटी दूर करून नुकसानभरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी आणि निकृष्ट बियाणे विकणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही पवारांनी पंतप्रधानांकडे केली.






या भेटीवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे म्हणाले की, पवार साहेब काल विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जंतर-मंतरवर गेले होते. त्यामुळे या समस्येवर योग्य मार्ग निघावा आणि विद्यार्थ्यांवरील कारवाई थांबावी, याच उद्देशाने ही भेट झाली असावी. त्यापलीकडे या भेटीत कोणताही राजकीय हेतू दडलेला नाही, असे स्पष्टीकरण शिंदे यांनी दिले.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि