IND vs ZIM 1st T20 Vaibhav Suryavanshi : १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची जगभर चर्चा! १८ चेंडूत अर्धशतक ठोकत रचला विश्वविक्रम

- झिम्बाब्वेविरुद्धच्या पदार्पणाच्या मालिकेत तुफानी खेळी; सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनला


मुंबई : भारताचा युवा सलामीवीर वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) याने झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्याच टी-२० सामन्यात धडाकेबाज फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण करत त्याने केवळ संघाला दमदार सुरुवात करून दिली नाही, तर सर्वात कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अर्धशतक झळकावणारा फलंदाज बनण्याचा ऐतिहासिक पराक्रमही आपल्या नावावर केला. (IND vs ZIM 1st T20)



१५ वर्षांतच जागतिक विक्रम :


वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) १५ वर्षे ११८ दिवस वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिले अर्धशतक झळकावले. यापूर्वी हा विक्रम नेपाळच्या कुशल मल्ला यांच्या नावावर होता. त्यांनी १५ वर्षे ३४० दिवस वयात आंतरराष्ट्रीय अर्धशतक झळकावले होते. वैभवने हा विक्रम मोठ्या फरकाने मोडीत काढत इतिहास रचला. (IND vs ZIM 1st T20)



टी-२० क्रिकेटमधील दोन विक्रमही केले नामोहरम :


आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावण्याचा विक्रम यापूर्वी जिब्राल्टरच्या लुईस ब्रूस (१६ वर्षे ५६ दिवस) यांच्या नावावर होता. तसेच आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांमध्ये हा विक्रम अफगाणिस्तानच्या रहमानुल्लाह गुरबाझ (१७ वर्षे २९६ दिवस) यांच्या नावावर होता. वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) या दोन्ही विक्रमांवर मात करत नवा इतिहास घडवला. (IND vs ZIM 1st T20)



T20I मध्ये सर्वात कमी वयात अर्धशतक करणारे फलंदाज :


- वैभव सूर्यवंशी (भारत) : १५ वर्षे ११८ दिवस विरुद्ध झिम्बाब्वेविरुद्ध, हरारे (२०२६)
- लुईस ब्रूस (जिब्राल्टर) : १६ वर्षे ५६ दिवस विरुद्ध माल्टा, अल्बेर्गारिया (२०२१)
- काविन चड्ढा (इंडोनेशिया) : १६ वर्षे ७६ दिवस विरुद्ध स्वीडन, बाली (२०२६)
- अलुसिने तुरे (सिएरा लिओन) : १६ वर्षे ८९ दिवस विरुद्ध घाना, बेनोनी (२०२३)
- तेनझिन राबगे (भूतान) : १६ वर्षे ११८ दिवस विरुद्ध चीन, क्वालालंपूर (२०२३) (IND vs ZIM 1st T20)



वैभव सूर्यवंशीची (Vaibhav Suryavanshi) ही तुफानी खेळी भारतीय क्रिकेटसाठी अत्यंत आशादायी मानली जात आहे. इतक्या लहान वयात जागतिक विक्रम करत त्याने भविष्यातील सुपरस्टार असल्याचे संकेत दिले असून, क्रिकेटविश्वातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. (IND vs ZIM 1st T20)

Comments
Add Comment

Team India : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, अय्यर कर्णधार; बुमराह, सॅमसन, सूर्यवंशीला संधी

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्ध सप्टेंबरमध्ये होणाऱ्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

MCA Captaincy : सिद्धेश लाड कडे मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा

मुंबई : मुंबईला सलग दुसऱ्या रणजी करंडक हंगामासाठी नवीन कर्णधार मिळणार आहे. अनुभवी फलंदाज सिद्धेश लाड २०२६-२७ च्या

Duleep Trophy Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं शतक अवघ्या ८ धावांनी हुकलं; सचिनचा 'तो' विक्रम मोडण्याची संधी गमावली

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Sooryavanshi) दमदार फलंदाजी करत सर्वांचे

Lionel Messi : मेस्सीचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलला अलविदा

अर्जेंटिना : अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली

Tiwana Football Club : वांद्र्यातील नेव्हिल डि'सूजा फुटबॉल मैदानावर तिवाना संघाची बाजी

- मुंबई फुटबॉल असोसिएशन फर्स्ट डिव्हिजन २०२६ च्या चषकावर कोरले नाव मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई फुटबॉल

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव