Uttar Pradesh Crime : चित्रकूटमध्ये धक्कादायक घटना : NEET च्या विद्यार्थिनीवर ३ नराधमांचा सामूहिक अत्याचार; मित्राचे हात-पाय बांधले आणि...

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) चित्रकूट (chitrakut) येथून अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची (NEET) तयारी करणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर तीन अज्ञात नराधमांनी सामूहिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. २२ जुलै रोजी बहिलपूरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील देवांगना विमानतळ परिसरातील जंगलात ही भयंकर घटना घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, घटनेला ४८ तास उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.



'वन विभाग कर्मचारी' असल्याचं सांगून उकळले पैसे, मग केला अत्याचार


मिळालेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थिनी तिच्या १७ वर्षीय मित्रासोबत दुचाकीवरून देवांगना विमानतळाजवळील निसर्गरम्य परिसरात फिरण्यासाठी गेली होती. त्याच वेळी एका दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञात तरुणांनी त्यांना अडवले. आपण 'वन विभागाचे कर्मचारी' असल्याचे भासवून आरोपींनी त्या दोघांना धमकावण्यास सुरुवात केली आणि पैशांची मागणी केली. जेव्हा मुलगी आणि तिच्या मित्राने याला विरोध केला, तेव्हा नराधमांनी त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.



मित्राला ओलीस ठेवून अत्याचार


आरोपींची विकृती इथेच थांबली नाही. त्यांनी विद्यार्थिनीच्या मित्राचे हात-पाय बांधून त्याला ओलीस ठेवले. त्यानंतर दोन नराधम त्या विद्यार्थिनीला बळजबरीने जवळच असलेल्या घनदाट झुडपांमध्ये ओढत घेऊन गेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक अत्याचार केला. या भयावह प्रसंगी विद्यार्थिनीने जीव वाचवण्यासाठी तीव्र प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी तिला अत्यंत अमानुषपणे मारहाण केली.



आरोपी CCTV कॅमेऱ्यात कैद


पीडित तरुणाने अत्यंत धैर्याने स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधून घटनेची माहिती दिली. मात्र, पोलीस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तिन्ही आरोपी तिथून पसार झाले होते. पोलिसांनी परिसर पिंजून काढत मुख्य रस्त्यांवरील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले असता, तिघे संशयित एका दुचाकीवरून वेगाने पळून जाताना स्पष्टपणे कैद झाले आहेत. सध्या पोलिसांचे सर्व्हिलन्स पथक या फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत आहे.



३ जिल्ह्यांत पोलिसांची छापेमारी


या खळबळजनक प्रकरणात पोलिसांनी २ नामांकित संशयितांसह त्यांच्या साथीदारांवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल केले आहेत. घटनेची माहिती मिळताच प्रयागराज झोनचे अप्पर पोलीस महासंचालक (ADG) ज्योती नारायण आणि चित्रकूटधाम रेंजचे पोलीस उपमहानिरीक्षक (DIG) राजेश एस. यांनी स्वतः घटनास्थळाची पाहणी केली असून तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. आरोपींच्या मुसक्या आवळण्यासाठी चित्रकूट, बांदा आणि प्रयागराज या तीन जिल्ह्यांमधील पोलिसांची विशेष संयुक्त पथके ठिकठिकाणी छापे मारत आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि