Viral Love Story : NEET आंदोलनात गेले अन् जुळली रेशीमगाठ; जंतर-मंतरवर घडली अनोखी प्रेमकहाणी


Viral Love Story : दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेले नीट परीक्षा गैरप्रकाराविरोधातील आंदोलन देशभर चर्चेत राहिले. या आंदोलनात देशभरातून अनेक तरुण-तरुणी सहभागी झाले होते. याच आंदोलनादरम्यान एक अत्यंत अनोखी आणि चित्रपटाला शोभेल अशी प्रेमकहाणी समोर आली आहे. आंदोलनात सहभागी झालेले दोन तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी मंदिरात लग्न करून नवीन आयुष्याला सुरुवात केली. या जोडप्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. (NEET Protest)



बिहारचा रहिवासी असलेला मोहन श्रीवास्तव नीट पेपर लीक प्रकरणी विरोध दर्शवण्यासाठी दिल्लीतील जंतर-मंतरवर आला होता. आंदोलनादरम्यान तिथे खाण्यापिण्याची सोय नसताना दिल्लीत राहणाऱ्या एका आंदोलक तरुणीने त्याला खाऊ दिले. नंतर तिने त्याला पाणीही आणून दिले. हळूहळू त्यांच्यात संवाद वाढला आणि मैत्री झाली. ती तरुणी स्वतः नीट परीक्षेची विद्यार्थिनी होती आणि न्यायाच्या मागणीसाठी आंदोलनात सहभागी झाली होती. (Viral Video)


याच दरम्यान आंदोलनात झालेल्या लाठीचार्जमध्ये मोहनच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो बेशुद्ध पडला. त्या तरुणीने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आणि त्याची काळजी घेतली. मोहन शुद्धीवर आल्यावर तिने त्याला आपल्या भावना सांगत प्रेमाची कबुली दिली. मोहननेदेखील तिचे प्रेम स्वीकारले. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर दोघांनीही वेळ न घालवता मंदिरात जाऊन विवाह केला. (Jantar Mantar)



लग्नानंतर मोहन तिला घेऊन आपल्या गावी बिहारला परतला. आंदोलनासाठी घरातून निघालेला मुलगा थेट घरात नवरी घेऊन आला, हे पाहून त्याचे कुटुंबीय आणि मित्रही अवाक झाले. सध्या या वेगळ्या लव्ह स्टोरीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. (Delhi New)



Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि