Randhir Jaiswal : पीओजेकेतील निवडणुका दिखावा, मानवी हक्क उल्लंघन लपवण्याचा प्रयत्न- रणधीर जयस्वाल

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीर (पीओजेके) येथे घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा निवडणुकांवर भारताने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले की, भारताने या निवडणुकांबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि ही संपूर्ण प्रक्रिया पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्याला वैधतेचे स्वरूप देण्याचा प्रयत्न आहे.



रणधीर जयस्वाल म्हणाले, “पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये घेतल्या जात असलेल्या तथाकथित विधानसभा निवडणुकांबाबतच्या बातम्या आम्ही पाहिल्या आहेत. जम्मू, काश्मीर आणि लडाखचा संपूर्ण केंद्रशासित प्रदेश, त्यात सध्या पाकिस्तानच्या बेकायदेशीर आणि बळजबरीच्या ताब्यात असलेले भागही समाविष्ट आहेत, हा भारताचा अविभाज्य भाग आहे.”परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी पुढे म्हटले, “सध्या राबवली जात असलेली ही दिखाऊ निवडणूक प्रक्रिया पाकिस्तानच्या बेकायदेशीर ताब्यावर पडदा टाकण्याचा आणि त्या भागातील गंभीर मानवी हक्कांच्या उल्लंघनांना लपवण्याचा केवळ एक प्रयत्न आहे.”त्यांनी असेही नमूद केले की, पाकिस्तानच्या ताब्यातील जम्मू-काश्मीरमध्ये सुरू असलेली व्यापक आंदोलने ही तेथील जनतेच्या आर्थिक शोषणाचा, त्यांच्या मूलभूत अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्याचा आणि प्रशासकीय दडपशाहीचा थेट परिणाम आहेत. (Randhir Jaiswal)

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या