Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू







चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात सोमवारी उशिरा रात्री पठाणकोट-भरमौर राष्ट्रीय महामार्गावर लाहाड गावाजवळ भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत एका वर्षाच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. चंदीगड येथे उपचार करून घरी परतत असताना त्यांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच बनीखेतजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर बचाव आणि मदतकार्य पूर्ण करण्यात आले. चंबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी सांगितले की, लाहाड परिसरात एका वाहनाचा गंभीर अपघात झाला असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी मदत व बचावकार्य करत असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.










पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बचन सिंह (रा. गेहरा), त्यांचा मुलगा रिपन कुमार, सून रिम्पी, कीर्ती आणि एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बचन सिंह हे व्यावसायिक चालक होते, तर रिपन कुमार हे हिमाचल प्रदेश पोलिसांच्या द्वितीय भारतीय राखीव बटालियन (सेकंड आयआरबीएन), सकोह येथे कार्यरत होते.हे कुटुंब चंदीगड येथे एका वर्षाच्या बालकावर उपचार करून आपल्या गावी परतत होते. मात्र, वाटेतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. अपघातात मृत्यू झालेली कीर्ती ही बचन सिंह यांच्या सख्ख्या भावाची मुलगी असून ती चंदीगडमध्ये शिक्षण घेत होती.पोलीसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि