Pimpari Chinchwad Metro : निगडी चाकण मेट्रो मार्गिकेला गती ; इतक्या कोटींचा आराखडा सादर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रस्तावित निगडी (भक्ती शक्ती) ते चाकण मेट्रो (Metro) मार्गिकेच्या सविस्तर प्रकल्प अहवालाचे (डीपीआर)(DPR) सोमवारी सादरीकरण करण्यात आले. सुमारे ₹१२,९३७ कोटी खर्चाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत ४५.२९५ किलोमीटर लांबीच्या मार्गावर ३४ मेट्रो स्थानके उभारण्याचा प्रस्ताव आहे. हा मार्ग पुणे मेट्रोच्या (Pune Metro) टप्पाक्रमांक २ अंतर्गत विकसित करण्यात येणार आहे.



महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी बैठकीत प्रकल्पाचा आराखडा सादर केला. यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, महापौर रवी लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर तसेच महापालिकेतील पदाधिकारी उपस्थित होते. हा डीपीआर (DPR) लवकरच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.


प्रस्तावित मार्गिका भक्ती शक्ती, वाकड चौक, नाशिक फाटा आणि संत तुकारामनगर या विद्यमान तसेच प्रस्तावित मेट्रो स्थानकांना जोडणार आहे. याशिवाय भक्ती शक्ती चौक, भुजबळ चौक, वल्लभनगर आणि मोशी येथे मल्टिमोडल ट्रान्सपोर्ट हब (Transport Hub) विकसित करण्याचाही आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रो (Metro), बस (Bus) आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमधील समन्वय अधिक प्रभावी होण्याची अपेक्षा आहे.


बैठकीदरम्यान भविष्यात तळवडेमार्गे निगडी-चाकण मेट्रोला जोडून शहरात ‘रिंग मेट्रो नेटवर्क’(Ring Metro Network) उभारण्याची संकल्पनाही मांडण्यात आली. वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि भविष्यातील प्रवासी संख्या लक्षात घेऊन शहरातील मेट्रोचे जाळे अधिक व्यापक करण्यावर या आराखड्यात विशेष भर देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी