Maharashtra Rain Alert : 29 ते 31 जुलैदरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढणार; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याच्या प्रभावामुळे 29 ते 31 जुलैदरम्यान महाराष्ट्रातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे. (Maharashtra Rain)


हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या कालावधीत विदर्भ, उत्तर मराठवाडा आणि खानदेशमध्ये जोरदार वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तुलनेने कमी पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Rain Alert)



अतिवृष्टीसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने सखल भागांत पाणी साचणे, नदी-नाल्यांना पूर येणे, वाहतुकीवर परिणाम होणे तसेच काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरात दरड कोसळण्याचाही धोका व्यक्त करण्यात आला आहे. (Monsoon Update)


29 जुलै रोजी कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव प्रामुख्याने पूर्व विदर्भात जाणवेल. 30 जुलै रोजी पश्चिम विदर्भ, खानदेश, उत्तर मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील घाट परिसर आणि कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर 31 जुलै रोजी खानदेश आणि मध्य महाराष्ट्रातील घाट भागात पावसाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे. (IMD Alert)


मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशातही 30 आणि 31 जुलैदरम्यान पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता असून, विशेषतः रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यांमध्ये 30 जुलै रोजी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.


राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने विदर्भ, उत्तर मराठवाडा, खानदेश, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. सखल भाग, नदी-नाल्यांच्या परिसरात तसेच घाट रस्त्यांवरून प्रवास करताना आवश्यक खबरदारी घ्यावी आणि आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे. (Rain Forecast)

Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी