Chitrakoot Raped News : NEETची तयारी करणाऱ्या तरुणीवर सामूहिक अत्याचार; दोन संशयित ताब्यात

चित्रकूट : उत्तर प्रदेशातील चित्रकूट (Chitrakoot Raped News) जिल्ह्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. NEET वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या मध्य प्रदेशातील 19 वर्षीय तरुणीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, दोन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी असून ती राजस्थानमधील कोटा येथे NEET परीक्षेची तयारी करत होती. काही दिवसांपूर्वी ती चित्रकूट येथे नातेवाईकांकडे राहण्यासाठी आली होती. (Chitrakoot Raped News)


ही घटना बुधवारी चित्रकूटमधील देवांगना खोऱ्यात घडली. पीडित तरुणी आपल्या १७ वर्षीय मैत्रिणीसोबत पर्यटनस्थळी गेली होती. दोघी मोटारसायकल पार्क करून पायी जात असताना तीन आरोपींनी त्यांचा पाठलाग केला आणि जंगल परिसरात त्यांना अडवले. (Chitrakoot Raped News)



आरोप आहे की, आरोपींनी दोघींना मारहाण केली आणि त्यानंतर १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक अत्याचार केला. तसेच आरोपींनी पैसे मागितले आणि घटनास्थळावरून पळून जाण्यापूर्वी दोघींनाही धमकावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. (Chitrakoot Raped News)


घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर सर्कल ऑफिसर आणि बहिलपूरवा पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. (Chitrakoot Raped News)


चित्रकूटचे पोलीस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की, पीडितेला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, घटनेचा सखोल तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि सायबर सेलच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेले विशेष पथक तयार करण्यात आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७० (सामूहिक बलात्कार) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून विविध पातळ्यांवर तपास सुरू आहे. (Chitrakoot Raped News)



या घटनेनंतर परिसरात संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. NEETसारख्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर झालेल्या या हल्ल्यामुळे महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. (Chitrakoot Raped News)

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या