Nashik-Pune Elevated Corridor : नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरला वेग; लोकसभेत नितीन गडकरींची मोठी घोषणा, २०३०-३१ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य

Nashik-Pune Elevated Corridor : नाशिक-पुणे महामार्गावरील (Nashik-Pune Highway) भीषण वाहतूक कोंडी, वाढते अपघात आणि रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा आता थेट लोकसभेत गाजला आहे. नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी हा प्रश्न उपस्थित करत केंद्र सरकारकडे महामार्गाच्या सुधारणांबाबत आणि प्रस्तावित एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या सद्यस्थितीबाबत माहिती मागितली. (Nashik-Pune Elevated Corridor)



रस्त्याच्या दुरवस्थेचा मुद्दा लोकसभेत


लोकसभेत बोलताना खासदार वाजे (MP Rajabhau Waje) यांनी नाशिक-पुणे महामार्ग हा नाशिकच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे सांगितले. कृषी उत्पादनांची वाहतूक, औद्योगिक मालाची ने-आण, पर्यटन, शिक्षण आणि आरोग्य सेवांसाठी दररोज लाखो नागरिक या मार्गाचा वापर करतात. मात्र, नाशिक-पुणे महामार्गावर राजगुरूनगर, मोशी, चाकण आणि आळेफाटा परिसरात कायमस्वरूपी वाहतूक कोंडी होते. सध्या काही ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे सुरू असल्याने एकाच बाजूने दोन्ही दिशांची वाहतूक सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट होत असून वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून राहावे लागत असल्याचे वाजे यांनी सांगितले. तसेच, नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या (Nashik-Pune Elevated Corridor) कामाला अद्याप गती मिळालेली नसल्याची बाबही त्यांनी लोकसभेत मांडली. त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात खासदार राजाभाऊ वाजे (MP Rajabhau Waje) यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला. (Nashik-Pune Elevated Corridor)



नाशिक-पुणे एलिव्हेटेड कॉरिडॉरला वेग


यावर उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामार्फत पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील विविध जंक्शनची सुधारणा आणि वाहतूक व्यवस्थापनाची कामे सुरू असल्याची माहिती दिली. विशेषतः चाकण आणि खेड परिसरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, या मार्गावरील वाहतूक समस्येवर कायमस्वरूपी तोडगा म्हणून ७,८०१ कोटी रुपये खर्चून आठ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर (Elevated Corridor) उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असून २०३०-३१ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आल्याची माहिती गडकरी (Minister Nitin Gadkari) यांनी लोकसभेत दिली. या प्रकल्पामुळे भविष्यात नाशिक-पुणे प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

अर्शदीप सिंगला दुखापत; सुनील गावस्कर शमार जोसेफवर संतापले! नेमकं काय म्हणाले?

हैदराबाद : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील रंगतदार मालिकेतील चौथ्या टी-20 सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

भारतीय फुटबॉलचे भविष्य बदलणार? केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि रोनाल्डो नाझारिओ भेट चर्चेत

नवी दिल्ली : भारतातील क्रीडा परिसंस्थेला अधिक बळकट करण्यासाठी आणि तरुण फुटबॉलपटूंना जागतिक स्तरावर

Kanya Pujan 2026: कन्या पूजनसाठी 9 कन्या मिळाल्या नाही तर काय करायचं? काय सांगतं शास्त्र

शारदीय नवरात्री सुरू असून देवीच्या नऊ रुपांची मोठ्या भक्तिभावाने पूजन केलं जात आहे. या दरम्यान कन्या पूजनचं

AUS vs SA Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा मोठा निर्णय! ब्रिट्झकेला संधी, रबाडाचे पुनरागमन?

डर्बन (दक्षिण आफ्रिका) : ऑस्ट्रेलियाविरुद्ध डर्बन येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 214

Singer Abhijeet Sawant: 'इंडियन आयडॉल लिजेंड्स रिटर्न' मध्ये गायक अभिजीत सावंतची एंट्री!

ज्याने २० वर्षांपूर्वी पहिला वहिला इंडियन आयडॉल हा नामांकित शो जिंकला आणि जो जगभरातील प्रेक्षकांच्या घरघरात