Akkalkot : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराचा म्हाडामार्फत होणार नियोजनबद्ध विकास

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विशेष नियोजन प्राधिकरणास मान्यता


मुंबई : अक्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ मंदिर परिसराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) यांची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यास उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी मान्यता दिली. यामुळे मंदिर परिसरातील रस्ते, वाहनतळ, आरक्षण क्षेत्रांचा विकास आणि आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (Eknath Shinde)



अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मागणी केली होती त्याचबरोबर त्यांनी याबाबत पाठपुरावा देखील केला होता. त्यानुसार अक्कलकोट नगरपरिषद, सोलापूर जिल्हाधिकारी आणि म्हाडा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार, अक्कलकोट मंदिर परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण व विकास, वाहनतळ उभारणी, आरक्षित जागांचा विकास तसेच परिसराचे सुयोग्य नियोजन करण्याची कामे हाती घेतली जाणार आहेत. या विकास आराखड्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी म्हाडाने सुमारे ५०० कोटींची तरतूद करण्याची तयारी दर्शविली आहे.


याशिवाय, पालखी मार्ग, समाधी मंदिर परिसर, शहरातील वाहतूक व्यवस्था, तलाव व बगीचे तसेच परिसरातील अन्य सार्वजनिक सुविधांचा विकासही या नियोजनामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे अक्कलकोट तीर्थक्षेत्राचा विकास अधिक वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने होणार असून भाविकांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होणार आहेत. या निर्णयानंतर विशेष नियोजन प्राधिकरणाबाबतची अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित क्षेत्रातील विद्यमान नियोजन प्राधिकरणाचे अधिकार संपुष्टात येऊन म्हाडाकडे नियोजन व विकासाची जबाबदारी सोपविण्यात येणार आहे. (MHADA)

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी