Ram Kulkarni : 'नेरळकर कुटुंबाची बदनामी केल्याचा आरोप'; हर्षवर्धन सपकाळ, नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

मुंबई : बारावीतील विद्यार्थ्याच्या शैक्षणिक गुणवत्तेबाबत करण्यात आलेल्या आरोपांवरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी (BJP State Spokesperson Ram Kulkarni) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस नेते तथा आमदार नाना पटोले आणि पक्षाचे प्रवक्ते बालाजी गाडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्याविरोधात बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित काँग्रेस नेत्यांनी दिवसभर माध्यमांसमोर कथितपणे चुकीची माहिती देत सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मात्र, या राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या दरम्यान नांदेड येथील नेरळकर कुटुंब आणि त्यांच्या मुलांची सार्वजनिक बदनामी झाली असून, त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मानसिक त्रास सहन करावा लागला.



कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी दावा केला की, नेरळकर कुटुंबातील विद्यार्थ्यांनी बारावीच्या शिक्षणासोबतच स्पर्धात्मक परीक्षांसाठी कठोर परिश्रम घेत CAT परीक्षेत 99 पर्सेंटाइल गुण मिळवले आहेत. अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून त्यांच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप त्यांनी केला.


"राजकीय आरोप करताना एका विद्यार्थ्याचे आणि त्याच्या कुटुंबाचे नाव सार्वजनिकरीत्या घेत बदनामी करण्यात आली. अशा प्रकारामुळे संबंधित विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बालकांच्या मानसिक छळासंदर्भातील कायद्यांनुसार संबंधित नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा," अशी मागणी राम कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी केली.



तसेच, नेरळकर कुटुंबीयांची जाहीर माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी काँग्रेस नेत्यांकडे केली आहे. "राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना लक्ष्य करणे योग्य नाही," असेही कुलकर्णी (Ram Kulkarni) यांनी म्हटले.


दरम्यान, या आरोपांवर काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणावर संबंधित नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.




Comments
Add Comment

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Audi India : ऑडी इंडियाकडून ‘ऑल-न्यू ऑडी क्यू३’च्या बुकिंगला सुरुवात; ग्राहक १,००,००० रुपयांच्या टोकन रकमेसह ही एसयूव्ही बुक करू शकतात

मुंबई : ऑडी या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने आज भारतात ऑल-न्यू ऑडी क्यू३ च्या बुकिंगला सुरुवात केली आहे. ही

OBC Cabinet Sub Committee : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीवर ३ मंत्र्यांचा बहिष्कार

- छगन भुजबळ, गुलाबराव पाटील आणि संजय राठोड यांचा समावेश मुंबई : ओबीसी महामंडळाला योग्य प्रमाणात निधीची तरतूद केली

Nashik : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला नाशिक परिमंडळात उत्स्फूर्त प्रतिसाद

Nashik : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला (Pradhan Mantri Surya Ghar Free Electricity Scheme) महावितरणच्या

Tragic CNG Pump Accident : CNG भरताना होज फुटला, नोजल डोक्याला लागला; 24 वर्षीय पंप कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू

जमशेदपूर : कारमध्ये CNG भरत असताना अचानक रिफ्युएलिंग होज फुटल्याने झालेल्या भीषण अपघातात पेट्रोल पंपावरील 24

Drug Free Maharashtra : महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्यासाठी २०२९ची डेडलाईन

- नव्या धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी; ग्रामपातळीपासून मंत्रालयापर्यंत जबाबदाऱ्यांचे वाटप मुंबई : नक्षलमुक्त