Health Benefits of Bajra: थंडीत बाजरी खाण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?

अलीकडेच मुंबईसह राज्यात थंडी पडायला सुरुवात झाले. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात अनेक बदल केले जातात. या काळात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आवश्यक पोषण देणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. त्याच अनुषंगाने हिवाळ्यात बाजरीचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

Health Benefits of Bajra: अलीकडेच मुंबईसह राज्यात थंडी पडायला सुरुवात झाले. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आहारात अनेक बदल केले जातात. या काळात शरीराला उबदार ठेवण्यासाठी आवश्यक पोषण देणारे पदार्थ खाण्यावर भर दिला जातो. त्याच अनुषंगाने हिवाळ्यात बाजरीचा आहारात समावेश करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. बाजरीमध्ये असलेले पोषक घटक शरीराला ऊर्जा देतात. तसेच पचनक्रिया सुधारण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. थंडीच्या दिवसांत बाजरी खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे मिळतात, जाणून घेऊया.


बाजरीमध्ये फायबर, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे बाजरीची भाकरी, लाडू, लापशी किंवा खिचडी अशा वेगवेगळ्या प्रकारे बाजरी आहारात समाविष्ट करता येते. याशिवाय त्वचेच्या आरोग्यासाठीही बाजरीतील पोषक घटक उपयुक्त ठरू शकतात. वजन कमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींसाठी आहारात बाजरीचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते. शरीरातील तापमान संतुलित ठेवण्यास मदत करते. बाजरी मध्ये असलेल्या फायबरमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होऊ शकते. यांसारख्या अनेक गोष्टींसाठी बाजरी उपयुक्त आहे. त्यामुळे थंडीत बाजरी खाण्यास सुरुवात करा. (Health Benefits of Bajra)






बाजरी खाण्याचे फायदे



• बाजरीच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते.


• बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुरळीत राहण्यास मदत होते. तसेच आतड्यांची हालचाल नियमित राहण्यास मदत होते.


• शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास मदत करतात.


• बाजरी कॅल्शियमचा उत्तम स्रोत आहे, ज्यामुळे हाडे मजबूत होतात आणि थंडीतील सांधेदुखी कमी होते.


• तसेच ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.


• बाजरीतील पोषक घटक थायरॉईडशी संबंधित आरोग्य आणि शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. ( Bajra for Immunity)


• बाजरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असल्यामुळे वारंवार भूक लागत नाही.


• रोगप्रतिकारशक्ती आणि त्वचेचे आरोग्य सुधारते.


• बाजरीमध्ये लोह, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारखी पोषक तत्त्वे असल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतात.


Comments
Add Comment

शहराच्या झगमगाटापासून दूर... शहापुरात उलगडणार ताऱ्यांचे विश्व; महाराष्ट्रातील नवे डार्क स्काय झोन

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील शहापूर येथे उभारण्यात आलेले पहिले अत्याधुनिक आणि हाय-टेक 'सॅपो' (SAPO) तारांगण सध्या संपूर्ण

वर्ल्ड कपआधी टीम इंडियाची डोकेदुखी वाढली, न्युझीलंड विरुद्धची मालिका जिंकूनही 'या' चुकांवर दुर्लक्ष केलं तर...

मुंबई: न्युझीलंडमधील बे ओव्हल या होम ग्राऊंडमध्ये आज, न्युझीलंड विरुद्ध भारत हा सामना रंगला. ह्या शेवटच्या

Fire News: पनवेलच्या स्टील मार्केटमध्ये भीषण आग! थिनरच्या ड्रमचा मोठा स्फोट, अग्निशमन जवान जखमी

Panvel Fire News: नवी मुंबईमधील पनवेल परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. कळंबोली येथील स्टील मार्केटमधील एका गॅरेज आणि

Samruddhi Mahamarg : 120 वेगमर्यादेच्या समृद्धी महामार्गावर गुरांचा कळप! वाहनचालकांचा थरकाप, मोठा अनर्थ टळला

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील समुद्धी महामार्गावर दुसरबीड टोल प्लाजा परिसराजवळ नुकताच २ दिवसापूर्वी भीषण

केंद्र सरकारकडून आदिवासी बांधवांवर योजनांचा पाऊस, 'या' गोष्टींमुळे समाजाचे पालटणार जीवन

मुंबई: भारतात आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या संस्कृतीच्या जतनासाठी केंद्र सरकारने एक ऐतिहासिक

एकतर्फी प्रेमातून तरुणीवर चाकूने हल्ला; अंबरनाथमध्ये धक्कादायक घटना

अंबरनाथ : अंबरनाथ परिसरातून येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भर रस्त्यात एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने