Karnataka HIV Cases: धक्कादायक! एक नाही, दोन नाही तर तब्बल ७००० विद्यार्थी HIV बाधित, नेमकं काय आहे प्रकरण?


कर्नाटकातील सरकारकडून महाविद्यालयांमध्ये विशेष तपासणी मोहीम सुरू



कर्नाटकातील १८ ते २५ वयोगटातील ७,००० हून अधिक तरुण आणि विद्यार्थी एचआयव्ही बाधित आढळल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत कर्नाटक सरकारने आता सर्व अभियांत्रिकी आणि पदवी महाविद्यालयांमध्ये एचआयव्ही तपासणी तसेच समुपदेशन शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. ही शिबिरे सर्व सरकारी, अनुदानित आणि खाजगी महाविद्यालयांमध्ये घेतली जातील. परंतु, कोणत्याही विद्यार्थ्याची तपासणी त्याच्या संमतीशिवाय केली जाणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.



कर्नाटक राज्य एड्स प्रतिबंधक सोसायटीच्या शिफारशीनुसार उच्च शिक्षण विभाग आणि तंत्रज्ञान विद्यापीठाने महाविद्यालयांमध्ये एकात्मिक आरोग्य शिबिरे सुरू केली आहेत. नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनच्या अहवालानुसार भारतात एचआयव्ही बाधितांच्या संख्येत कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकात सध्या सुमारे २.६० लाख लोक एचआयव्हीसह जगत आहेत. मात्र त्यापैकी २.०५ लाख लोकच उपचार घेत आहेत. म्हणजेच ५४ हजार लोकांना आपल्याला संसर्ग झाल्याची माहितीच नाही.


१८ ते ३५ वयोगटातील तरुणांमध्ये एचआयव्हीचे प्रमाण वेगाने वाढले आहे. २०२३-२४ मध्ये ही संख्या ४४,५०० होती, ती आता ६६,६०० वर पोहोचली आहे. यामध्ये १८ ते २५ वयोगटातील ७,००० हून अधिक विद्यार्थी आढळल्याने प्रशासनाने महाविद्यालयांवर लक्ष केंद्रित केले आहे. विद्यार्थ्यांची गोपनीयता जपण्यासाठी विशेष क्यूआर कोड आधारित स्व-जोखीम मूल्यांकन सुविधाही सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थी मोबाईलद्वारे क्यूआर कोड स्कॅन करून स्वतःच्या धोक्याची माहिती घेऊ शकतात.



या मोहिमेचा मुख्य उद्देश संसर्गाचे वेळेत निदान करून उपचार सुरू करणे आणि तरुणांमध्ये जागृती निर्माण करणे हा आहे. ९५ टक्के बाधितांना त्यांच्या आजाराची माहिती असणे, ९५ टक्के रुग्णांना उपचारांशी जोडणे आणि ९९ टक्के रुग्णांमधील व्हायरसचा प्रभाव कमी करणे हे उद्दिष्ट या मोहिमेद्वारे साध्य केले जाणार आहे. या



Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.