World Tiger Day 2026: जिथे एकेकाळी गावं होती, तिथे आज वाघांची डरकाळी! सातपुड्यात वाघांचा मुक्त संचार

भोपाल : एकेकाळी मानवी वस्तीने गजबजलेला परिसर आज वाघांच्या अधिवासात रूपांतरित झाला आहे. मध्य प्रदेशातील सातपुडा व्याघ्र प्रकल्पाने संवर्धनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवत जागतिक व्याघ्र दिनानिमित्त (World Tiger Day) एक प्रेरणादायी उदाहरण समोर ठेवले आहे. नॅशनल टायगर कन्झर्व्हेशन अथॉरिटी (NTCA) कडे सादर करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणानुसार, सातपुडा व्याघ्र प्रकल्पात आता ५५ हून अधिक वाघांचा वावर असून, त्यापैकी जवळपास १० वाघांची प्रथमच नोंद झाली आहे. २०१८ मध्ये येथे ४५ वाघांची नोंद झाली होती. या वाढीमागे केवळ नैसर्गिक प्रजनन नसून गेल्या दशकभरात राबविण्यात आलेले नियोजनबद्ध संवर्धन महत्त्वाचे ठरले आहे. सुमारे २,१५० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या या व्याघ्र प्रकल्पातील ५० हून अधिक वनगावांचे पुनर्वसन करण्यात आले. मानवी हस्तक्षेप कमी झाल्यानंतर तब्बल ११ हजार हेक्टर क्षेत्र गवताळ अधिवासात विकसित करण्यात आले, ज्यामुळे वन्यजीवांसाठी सुरक्षित आणि नैसर्गिक वातावरण निर्माण झाले.(World Tiger Day)



वन विभागाने तृणभक्षी प्राण्यांसाठी ८५ प्रकारच्या पौष्टिक गवतांची लागवड केली. त्यामुळे हरणांसारख्या प्राण्यांची संख्या वाढली आणि त्यातून वाघांसाठी आवश्यक असलेली नैसर्गिक खाद्यसाखळी अधिक मजबूत झाली. याशिवाय, खाद्याची उपलब्धता वाढवण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पातून १,६०० चितळ सातपुड्यात आणून सोडण्यात आले. या उपक्रमामुळे संपूर्ण जंगलातील जैवविविधतेला चालना मिळाल्याचे वन विभागाचे म्हणणे आहे.(World Tiger Day)


वाघांच्या संरक्षणासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचाही प्रभावी वापर करण्यात येत आहे. संपूर्ण व्याघ्र प्रकल्पात १७० पेट्रोलिंग कॅम्प्स(petrolling camps) उभारण्यात आले असून, जंगलातील १२२ बीट्सवर ड्रोनच्या(dron) माध्यमातून सतत देखरेख ठेवली जाते. वाहनांसह बोटींच्या साहाय्याने जलमार्गावरही नियमित गस्त घातली जात असल्याने शिकारी आणि बेकायदा मानवी हालचालींवर प्रभावी नियंत्रण ठेवता येत आहे.(World Tiger Day)


दरम्यान, ऑक्टोबरमध्ये सातपुडा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी पुन्हा खुला झाल्यानंतर जंगल सफारीदरम्यान वाघांचे दर्शन होण्याची शक्यता यंदा अधिक असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वाढलेली वाघांची संख्या, सुधारलेला अधिवास आणि सक्षम सुरक्षा व्यवस्था यामुळे सातपुडा व्याघ्र प्रकल्प देशातील वन्यजीव पर्यटनाचे आणखी एक आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे. (World Tiger Day)

Comments
Add Comment

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी