Army Chief General Dhiraj Seth : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड' डिझेलचा केला प्रारंभ

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी नवी दिल्ली येथे स्वदेशात विकसित 'एक्सट्रीम वेदर ग्रेड' (एक्सडब्ल्यूजी) डिझेलचा प्रारंभ केला. भारतीय लष्कर आणि तेल विपणन कंपन्यांनी संयुक्तपणे विकसित केलेले, हे विशेष इंधन अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत लढाऊ आणि लॉजिस्टिक वाहनांची गतिशीलता, सुरक्षितता आणि परिचालनात्मक उपलब्धता वाढवेल. अती उंचीवरील आणि कडाक्याच्या थंडीच्या प्रदेशांमध्ये या तंत्रज्ञानाचा व्यापक नागरी वापरही होऊ शकतो, तसेच हे 'आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले एक महत्वाचे पाऊल आहे.



अत्यंत कमी तापमानात पारंपरिक डिझेल घट्ट होऊन इंधन फिल्टरमध्ये अडथळा निर्माण करू शकते, यामुळे उंचावरील आणि बर्फाच्छादित भागांत वाहनांच्या ऑपरेशनवर परिणाम होतो. एक्सडब्ल्यूजी डिझेल या आव्हानावर मात करते आणि उणे 42 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानातही प्रभावी राहते. BS-VI मानके आणि IS 1460:2025 शी सुसंगत असलेले हे इंधन, इंजिनमध्ये कोणताही बदल किंवा 'री-होमोलोगेशन' (पुन्हा प्रमाणीकरण) न करता भारतीय लष्कराच्या सध्याच्या वाहनांच्या ताफ्यात वापरता येईल. (Army Chief General Dhiraj Seth)



या प्रसंगी बोलताना, लष्करप्रमुख म्हणाले की, एक्सडब्ल्यूजी डिझेल म्हणजे क्रांती घडवणारा स्वदेशी नवोन्मेष आहे, जे अत्यंत प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत गतिशीलता, परिचालन सज्जता आणि मोहिमेची विश्वासार्हता वाढवेल. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, या इंधनामुळे कडाक्याच्या थंडीत वाहने चालू स्थितीत ठेवण्यासाठी यापूर्वी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची गरज राहणार नाही, यामुळे कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि मनोबल उंचावेल. एका वर्षाच्या आत हे डीझेल विकसित केल्याबद्दल लष्करप्रमुखांनी भारतीय लष्कराच्या पथकाची आणि तेल विपणन कंपन्यांची प्रशंसा केली. तसेच, या सहयोगामुळे विविध परिचालन गरजांसाठी विशेष इंधनाचे आणखी काही प्रकार विकसित केले जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.लष्करी उपयोगांव्यतिरिक्त, ही तंत्रज्ञान प्रणाली अतिउंचीवरील आणि अत्यंत कडाक्याच्या थंडीचे हवामान असलेल्या प्रदेशांमधील नागरी वापरकर्त्यांसाठीही फायदेशीर ठरेल, तसेच अत्यंत प्रतिकूल हवामानात कार्यरत वाहने आणि उपकरणांची विश्वासार्हता आणि सुरक्षितता सुधारेल.

Comments
Add Comment

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग

Bihar Boat Accident : बिहारमध्ये गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटली; 13 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती

बिहार : बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील हाजीपूरजवळ गंगा नदीत प्रवाशांनी भरलेली बोट उलटल्याची दुर्घटना घडली आहे.