IndiGo Airlines : पर्यटन मंत्रालयाचा इंडिगोसोबत सामंजस्य करार

नवी दिल्ली : केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नवी दिल्ली येथे भारताला जागतिक स्तरावरील पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून पुढे आणण्यासाठी इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेड (इंडिगो) यांच्याशी सामंजस्य करार केला. हा करार धोरणात्मक स्वरूपाचा असून, तो केवळ इंडिगोपुरता मर्यादित नसून त्याअंतर्गत कोणतीही आर्थिक बांधिलकी नाही.(Indigo)



या प्रसंगी बोलताना गजेंद्र सिंह शेखावत (Gajendra Singh Shekhawat)म्हणाले की, पर्यटन मंत्रालयाचा प्रमुख ‘इन्क्रेडिबल इंडिया’ (अतुल्य भारत) ब्रँड आणि इंडिगोचे व्यापक देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय जाळे एकत्र आल्यामुळे भारताच्या पर्यटन प्रसाराला अधिक बळ मिळेल. अशा सहकार्यात्मक उपक्रमांमुळे भारतातील पर्यटनविषयक माहिती अधिक व्यापक जनसमुदायापर्यंत पोहोचण्यास मदत होईल आणि जगातील अग्रगण्य पर्यटनस्थळांपैकी एक म्हणून भारताचे स्थान अधिक बळकट होईल, असे त्यांनी नमूद केले.


या सामंजस्य कराराअंतर्गत, पर्यटन मंत्रालय आणि इंडिगो संयुक्तपणे “इन्क्रेडिबल इंडिया बाय इंडिगो” नावाचा जागतिक संवाद उपक्रम राबवतील. ही मोहीम भारताच्या समृद्ध आणि वैविध्यपूर्ण पर्यटन परंपरांचे प्रदर्शन करेल, ज्यामध्ये सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य, अध्यात्मिक स्थळे, वेलनेस (आरोग्य पर्यटन), साहसी खेळ, वन्यजीव आणि इतर अनुभवात्मक पर्यटनीय घटकांचा समावेश असेल.



या मोहिमेचा प्रचार डिजिटल आणि मुद्रित माध्यमे, विमानतळांवरील प्रचार माध्यमे, विमानातील (In-flight) माध्यमे, समाजमाध्यमे, आंतरराष्ट्रीय पर्यटन प्रदर्शने तसेच इतर प्रचार माध्यमांद्वारे केला जाईल. पर्यटन मंत्रालय ‘इन्क्रेडिबल इंडिया’ ब्रँडची प्रचार सामग्री आणि इतर साधनसंपत्ती वापरण्याची परवानगी देईल. तसेच, शक्य असेल तेथे मोहिमेच्या उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी संबंधित घटकांशी समन्वय साधण्यास सहकार्य करेल.


इंडिगो पर्यटन स्थळांवर आधारित आशय तयार करेल आणि तिच्या ग्राहक संवाद मंचावर भारताच्या पर्यटनविषयक माहितीचा विस्तार करेल. या सहकार्याअंतर्गत पर्यटन प्रोत्साहन उपक्रमांमध्ये संयुक्त सहभाग, विशिष्ट पर्यटनस्थळांवर केंद्रित मोहिमा तसेच देशांतर्गत आणि प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये भारताच्या पर्यटन क्षमतेचा प्रभावी प्रचार करण्यासाठी परस्पर संमतीने राबविण्यात येणाऱ्या इतर उपक्रमांचाही समावेश आहे.



हा सामंजस्य करार प्रारंभी दोन वर्षांसाठी वैध असेल. भारताच्या पर्यटन क्षमतेचा प्रचार करणे, आंतरराष्ट्रीय पर्यटकांचे आगमन वाढवणे आणि भारताला जागतिक स्तरावरील आघाडीचे पर्यटनस्थळ म्हणून स्थापित करणे, या पर्यटन मंत्रालय आणि इंडिगो यांच्या सामायिक वचनबद्धतेचे, हे सहकार्य द्योतक आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ४ लाखांहून अधिक मतदारांची नावे वगळली, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध

Ahilyanagar : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत अर्थात एसआयआर पडताळणीत जिल्ह्यातील तब्बल ४ लाख २६ हजार

POCSO arrest Shahapur : ठाण्याच्या शहापूर आदिवासी शाळेत २२ विद्यार्थिनींचा विनयभंग; पोक्सो कायद्यांतर्गत नराधम मदतनीसाला अटक

Thane : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील एका शासकीय आदिवासी निवासी

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Eknath Shinde : ७.८ टक्के जीडीपी वाढ देशाच्या प्रगतीचे द्योतक!

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे; युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था मजबूत मुंबई : जगातील अनेक देशांमध्ये

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Nashik : ...अन् बिबट्या थेट घरात शिरला, कुटुंबियांच्या प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला

Nashik : नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भक्ष्याच्या शोधात आलेल्या एका बिबट्याने