Orange Alert : IMD चा ऑरेंज अलर्ट! मुंबईसह महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांत पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी १० वाजता नाऊकास्ट इशारा (Nowcast Warning) जारी केला आहे. हा इशारा पुढील काही तासांसाठी वैध असून राज्यातील ११ जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) देण्यात आला आहे.

IMD च्या अंदाजानुसार, मुंबई, रायगड, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, अहिल्यानगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना आणि लातूर जिल्ह्यांतील काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाच्या सरी (Moderate to Intense Rain Spells) पडण्याची शक्यता आहे.



हवामान विभागाने नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सखल भागात पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि दृश्यमानता कमी होण्याची शक्यता असल्याने अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात आला आहे. प्रशासनानेही नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
Comments
Add Comment

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि

महाराष्ट्रात डिजिटल शासनसेवांना मिळणार नवी गती ! डिजिटल शासनसेवा प्लॅटफॉर्म तात्काळ सुरु करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील नागरिकांना शासकीय सेवा अधिक जलद, सुलभ आणि पारदर्शक पद्धतीने ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी