Bomb Making Paper In Collage : धक्कादायक! अयोध्येच्या मेडिकल कॉलेजच्या एक्स-रे विभागात सापडला बॉम्ब बनवण्याचा कथित आराखडा; तीन विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

अयोध्या : उत्तर प्रदेशातील अयोध्या येथील राजर्षी दशरथ मेडिकल कॉलेजमध्ये शनिवारी सकाळी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. महाविद्यालयाच्या एक्स-रे विभागातील ड्रॉवरमध्ये बॉम्ब बनवण्याची कथित पद्धत लिहिलेला संशयास्पद कागद आढळून आला. ही बाब समोर येताच कॉलेज प्रशासनाने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दस्तऐवज जप्त केला असून या प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. (Bomb Making Paper In Collage)



एक्स-रे विभागातील ड्रॉवरमध्ये सापडला संशयास्पद दस्तऐवज :


मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी सुमारे ८ वाजता एक्स-रे विभागाचे प्रभारी नियमित कामासाठी विभागात आले असता त्यांनी ड्रॉवर उघडला. त्यामध्ये बॉम्ब तयार करण्याची कथित प्रक्रिया आणि त्याचा आराखडा नमूद असलेला कागद आढळला. प्रकाराचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने मेडिकल कॉलेजचे प्राचार्य आणि मुख्य वैद्यकीय अधीक्षक (सीएमएस) डॉ. अरविंद सिंग यांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. (Bomb Making Paper In Collage)



प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यावर संशय :


प्राथमिक तपासात पोलिसांना समजले की, शुक्रवारी रात्री एक्स-रे विभागात प्रथम वर्षाचा विद्यार्थी सरफराज ड्युटीवर होता. तो उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेशी त्याचा संबंध असू शकतो, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू करण्यात आली आहे. (Bomb Making Paper In Collage)



आणखी दोघेही चौकशीच्या फेऱ्यात :


तपासादरम्यान सरफराजसोबत ड्युटीदरम्यान आणखी दोन विद्यार्थी उपस्थित असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानुसार अभिषेक नावाच्या विद्यार्थ्याला रुग्णालय परिसरातून ताब्यात घेण्यात आले असून संतोष नावाच्या आणखी एका विद्यार्थ्याचीही चौकशी सुरू आहे. या दोघांची या प्रकरणातील भूमिका काय होती आणि त्यांना संबंधित दस्तऐवजाबाबत पूर्वकल्पना होती का, याचा तपास सुरू आहे. (Bomb Making Paper In Collage)



कॉलेज प्रशासन हाय अलर्टवर :


या घटनेनंतर मेडिकल कॉलेज प्रशासन सतर्क झाले आहे. सीएमएस डॉ. अरविंद सिंग यांनी सांगितले की, संशयास्पद दस्तऐवज आढळताच तात्काळ पोलिसांना कळवण्यात आले. कॉलेज प्रशासन तपासात पूर्ण सहकार्य करत असून पोलिसांच्या अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. दरम्यान, या घटनेमुळे कॉलेज परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. (Bomb Making Paper In Collage)

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि