Girl Apologizes To PM Modi : "मी फक्त १५ वर्षांची आहे, मला माफ करा": पंतप्रधान मोदींवर आक्षेपार्ह टिप्पणी करणाऱ्या मुलीचा माफीनामा; व्हिडिओ व्हायरल!

नवी दिल्ली : विद्यार्थ्यांच्या एका आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात चुकीची भाषा वापरल्यामुळे गुन्हा दाखल झालेल्या एका मुलीचा माफी मागणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती मुलगी आपले चुकीचे कृत्य मान्य करत देशाची माफी मागताना दिसत आहे.



"इतरांच्या सांगण्यावरून मी चूक केली..."


व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये ती मुलगी पट्टेरी टी-शर्ट घालून, हात जोडून बोलताना दिसते. "आंदोलनादरम्यान मी काही लोकांच्या भडकवण्याला बळी पडले आणि पंतप्रधान मोदींबद्दल खूप वाईट शब्द वापरले," असे तिने या व्हिडिओमध्ये मान्य केले आहे. पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीत (FIR) त्या मुलीचे वय २५ वर्षे असल्याचे नमूद केले होते. मात्र, या व्हिडिओमध्ये ती मुलगी दावा करत आहे की ती अवघी १५ वर्षांची आहे. व्हिडिओमध्ये ती म्हणाली, "मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे केले ते क्षमा करण्याच्या योग्यतेचे नाही, मी खूप चुकीचे शब्द वापरले आहेत."



मुलीने मागितली माफी


"ही माझी पहिली आणि शेवटची चूक आहे. मी संपूर्ण देशाची मनापासून माफी मागते. मला स्वतःचीच खूप लाज वाटत आहे, मी स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकत नाही. कृपया मला माफ करा."



पोलिसांनी केली होती कारवाई


पंतप्रधानांबद्दल अपशब्द वापरल्याप्रकरणी बुधवारी नोएडा पोलीस ठाण्यात या मुलीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. नोएडा पोलिसांनी या प्रकरणी झिरो एफआयआर (Zero FIR) नोंदवून पुढील कारवाईसाठी हे प्रकरण नवी दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग केले होते. "मुलीच्या वक्तव्यामुळे पंतप्रधानांच्या पदाचा अनादर झाला असून यामुळे समाजात शांतता भंग होऊ शकते," असे तक्रारदाराने म्हटले होते.



पंतप्रधान मोदींचे 'ते' आवाहन आणि मुलीची माफी


विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून अशा वक्तव्यांवर संयम आणि क्षमाशीलतेचे आवाहन केले होते. त्यांच्या या व्हिडिओनंतर काही तासांतच या मुलीचा माफीचा व्हिडिओ समोर आला.



"मुले भरकटली आहेत, त्यांना शिक्षा नको मार्ग दाखवा" – PM मोदी


पंतप्रधान मोदींनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटले होते की, "जंतर मंतरवर जे घडले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे. काही भरकटलेल्या तरुणांनी अशा भाषेचा वापर केला, ज्याला सुसंस्कृत समाजात स्थान नाही. मला आणि माझ्या स्वर्गीय आईलाही शिवीगाळ करण्यात आली." मात्र, रागाने किंवा सूडबुद्धीने याचे उत्तर देता येत नाही, असे सांगत पंतप्रधान पुढे म्हणाले, "लहानपणी चुका होतात आणि बालपणच त्या चुका सुधारण्याची संधी देते. समाजात संताप असणे स्वाभाविक आहे, पण आता या मुलांना जवळ करण्याची आणि त्यांना योग्य रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. ही भरकटलेली मुले आहेत. त्यांना कोर्टात खेचणे किंवा त्रास देणे हा त्यावरचा उपाय नाही." शेवटी बोलताना पंतप्रधानांनी सर्वांना क्षमा करण्याचे आवाहन केले, "मला त्यांना माफ करायचे आहे. समाजानेही माझे ऐकावे हीच विनंती. शिवीगाळ करून कधीही समस्या सुटत नाहीत. चला, भरकटलेल्यांना एकत्र येऊन योग्य मार्ग दाखवूया आणि भारतासाठी काम करूया."

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि