Devendra Fadnavis : "एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी..." ; पुण्यातील फडणवीसांच्या भाषणाची जोरदार चर्चा; जाणून घ्या नेमकं काय म्हणाले मुख्यमंत्री

पुणे : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल (Ajit Doval) यांचे भरभरून कौतुक करत केलेले भाषण विशेष चर्चेचा विषय ठरले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात झालेल्या या कार्यक्रमात अमित शाह यांच्या हस्ते अजित डोवाल यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.



'एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले' : 


कार्यक्रमात बोलताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे. राष्ट्रीय सुरक्षेला नवी दिशा देणारे अजित डोवाल यांना सन्मानित करण्यासाठी राजकारणातील धुरंधर अमित शाह (Amit Shah) उपस्थित आहेत. एका धुरंधराला पुरस्कार देण्यासाठी दुसरे धुरंधर आले आहेत."




अमित शाहांना दिली 'राजकारणातील चाणक्य'ची उपमा : 


फडणवीसांनी (Devendra Fadnavis) आपल्या भाषणात अमित शाह यांना "राजकारणातील चाणक्य", तर अजित डोवाल यांना "राष्ट्रीय सुरक्षेचे चाणक्य" अशी उपमा दिली. त्यांनी सांगितले की, २०१४ नंतर देशाच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल झाले असून, भारताची भूमिका आता केवळ बचावाची नसून आवश्यकतेनुसार ठोस प्रत्युत्तर देणाऱ्या राष्ट्राची झाली आहे.



लोकमान्य टिळकांच्या विचारांचा गौरव : 


लोकमान्य टिळकांचा उल्लेख करताना फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले की, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच," हा संदेश देत टिळकांनी राष्ट्रवादाची ज्योत प्रज्वलित केली. सार्वजनिक गणेशोत्सवाच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणत त्यांनी स्वातंत्र्यलढ्याला नवी दिशा दिली. अशा राष्ट्रवादी विचारांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार अजित डोवाल यांना मिळणे हा अभिमानाचा क्षण असल्याचे त्यांनी सांगितले.




'अजित डोवाल यांना शंभरीपर्यंत देशसेवेची शक्ती लाभो' : 


आपल्या भाषणाच्या शेवटी फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, "अजित डोवाल (Ajit Doval) यांना शंभर वर्षांपर्यंत देशसेवा करण्याची शक्ती लाभो, अशी मी प्रार्थना करतो. राष्ट्रप्रेम, त्याग आणि देशभक्तीचे प्रतीक असलेल्या व्यक्तीला हा पुरस्कार मिळणे ही सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे." फडणवीसांच्या या भाषणाला उपस्थितांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. अमित शाह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेला हा पुरस्कार सोहळा विशेष ठरला.




Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर