Liquor Ban : दारू मिळणारच नाही...ओल्ड मॉन्क सह 'या' प्रसिद्ध ब्रँड्सवर बंदी; प्रशासनाचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली : मद्यप्रेमींसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. देशातील लोकप्रिय आणि सर्वाधिक खप असलेल्या काही प्रमुख मद्य ब्रँड्सच्या विक्रीवर अन्न सुरक्षा प्राधिकरणाने अचानक बंदी घातली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (FSSAI) केलेल्या कारवाईमुळे मद्य क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध 'ओल्ड मॉन्क' (Old Monk) सह अनेक नामांकित ब्रँड्सच्या विशिष्ट प्रकारांची (Variants) विक्री तातडीने रोखण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून बाजारात ओल्ड मॉन्कचा तुटवडा जाणवत होता, मात्र आता FSSAI च्या या कठोर निर्णयामुळे या मद्यांच्या उपलब्धतेवर पूर्णपणे गदा आली आहे.



एफएसएसआय (FSSAI) च्या तपासणीत धक्कादायक बाब उघड!


FSSAI ने मद्य तयार करणाऱ्या कंपन्यांच्या उत्पादन प्रक्रियेची अचानक तपासणी केली होती. या पाहणीत डायजिओ इंडिया (Diagio India) ची उपकंपनी 'युनायटेड स्पिरिट्स', 'इनब्रू बेवरेजेस' आणि 'मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर' या कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये गंभीर गैरप्रकार आढळून आले. मद्य तयार करताना नैसर्गिक घटक आणि नैसर्गिक परिपक्वता (Natural Aging Process) प्रक्रियेचा वापर करणे नियमानुसार बंधनकारक असते. मात्र, या कंपन्यांनी अल्कोहोलला कृत्रिम स्वाद (Artificial Flavors) आणि सुगंध देण्यासाठी बाह्य घटकांची सर्रास भेसळ केल्याचे प्रयोगशाळेतील (Laboratory) तपासात निष्पन्न झाले आहे.



कारवाईच्या कचाट्यात सापडलेले प्रमुख ब्रँड्स



  • ओल्ड मॉन्क (Old Monk) - विशिष्ट प्रकार

  • अँटिक्विटी ब्लू व्हिस्की (Antiquity Blue Whisky)

  • रॉयल चॅलेंज व्हिस्की (Royal Challenge Whisky)


  • बॅगपायपर डिलक्स व्हिस्की (Bagpiper Deluxe Whisky)

  • ओल्ड कास्क डिलक्स XXX रम (Old Cask Deluxe XXX Rum)


या ब्रँड्समध्ये मद्याची मूळ चव निर्माण करण्यासाठी परवानगी नसलेले कृत्रिम फ्लेवर्स मिसळल्याचे स्पष्ट झाले आहे.



कोणत्या राज्यांमध्ये आणि प्लांटवर झाली ही कारवाई ?


अन्न सुरक्षा नियामकाने दिलेल्या माहितीनुसार, ही कारवाई विशिष्ट उत्पादन युनिट्सवर (Manufacturing Plants) करण्यात आली आहे. मध्य प्रदेश येथील 'युनायटेड स्पिरिट्स'च्या प्लांटमध्ये बनणारी अँटिक्विटी ब्लू व रॉयल चॅलेंज व्हिस्की, तसेच 'इनब्रू बेवरेजेस'ची बॅगपायपर डिलक्स व ओल्ड कास्क रम यांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. महाराष्ट्रातील 'मोहन रॉकी स्प्रिंगवॉटर' कंपनीद्वारे उत्पादित केल्या जाणाऱ्या ओल्ड मॉन्कच्या तीन प्रकारांवर थेट बंदी आणण्यात आली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, ही बंदी केवळ या ठराविक प्लांट्समध्ये तयार झालेल्या तुकड्यांपुरती (Batches) मर्यादित आहे की संपूर्ण देशभरातील साठ्यावर लागू होणार, याबाबत प्रशासनाकडून अधिक स्पष्टता येणे बाकी आहे.



नियमांचे उल्लंघन अन् लॅब रिपोर्टमधील खुलासा


भारतीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार, मद्यपेयांमध्ये मर्यादित प्रमाणात फक्त नैसर्गिक स्वादवर्धकांचा (Natural Flavoring Agents) वापर करण्यास मुभा दिली जाते. परंतु, FSSAI च्या लॅब रिपोर्टनुसार कंपन्यांनी नियम धाब्यावर बसवून व्हिस्कीमध्ये कृत्रिम 'व्हिस्की फ्लेवर' आणि रममध्ये कृत्रिम 'रम फ्लेवर'ची भेसळ केली होती. हे भारतीय अन्न सुरक्षा नियमांच्या थेट विरोधात असल्याने प्रशासनाने तात्काळ कठोर पाऊल उचलले.



भारतीय मद्य बाजारपेठेवर काय होणार परिणाम ?


भारत ही जगातील सर्वात मोठ्या मद्य बाजारपेठांपैकी एक असून, या उद्योगाचा वार्षिक महसूल सुमारे ४० अब्ज डॉलर्स (अंदाजे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांहून अधिक) इतका आहे. यामध्ये 'डियाजिओ इंडिया' ही देशातील सर्वात मोठी मद्य उत्पादक कंपनी मानली जाते. FSSAI च्या कारवाईच्या जाळ्यात अडकलेले सर्व ब्रँड्स देशांतर्गत उत्पादित (Domestic Brands) होणारे आहेत. महागड्या आयात केलेल्या (Imported) स्कॉच किंवा व्हिस्कीच्या तुलनेत यांचे दर खिशाला परवडणारे असल्याने आम जनतेत या ब्रँड्सची मागणी सर्वाधिक असते. सध्या FSSAI कडून खाद्य आणि पेय पदार्थांची अत्यंत कडक तपासणी मोहीम राबवली जात असून, या कारवाईमुळे मद्य उत्पादक कंपन्यांचे मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा