Windfall Tax : पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावर विंडफॉल टॅक्स वाढला; सरकारचा मोठा निर्णय, इंधनाच्या किमती वाढणार का?

निर्यात शुल्कात मोठी वाढ; देशांतर्गत इंधनाचा पुरवठा कायम ठेवण्यासाठी केंद्राचा निर्णय


केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि विमानांमध्ये वापरल्या जाणाऱ्या एव्हिएशन टर्बाइन फ्युएल (ATF) अर्थात जेट इंधनावरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ केली आहे. अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, हे नवीन दर ३ ऑगस्टपासून लागू झाले असून त्याचा उद्देश देशांतर्गत इंधनाचा पुरेसा साठा राखणे आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतारांवर नियंत्रण ठेवणे हा आहे. ( Windfall Tax )


नवीन निर्णयानुसार, पेट्रोलवरील निर्यात शुल्क प्रति लिटर २.५ रुपयांवरून ३.५ रुपये करण्यात आले आहे. डिझेलवरील एकूण निर्यात शुल्क १५.५ रुपयांवरून २५.५ रुपये प्रति लिटरपर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच एटीएफवरील निर्यात शुल्क १४.५ रुपयांवरून २२ रुपये प्रति लिटर करण्यात आले आहे.



सरकारच्या मते, आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमतीतील चढउतार आणि भू-राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा अबाधित राहावा आणि निर्यातीमधून होणारा अतिरिक्त नफा नियंत्रित ठेवता यावा, यासाठी विंडफॉल टॅक्समध्ये वाढ करण्यात आली आहे.


या निर्णयाचा सर्वसामान्य ग्राहकांवर थेट परिणाम होणार नाही. कारण हा कर पेट्रोल, डिझेल आणि एटीएफची निर्यात करणाऱ्या कंपन्यांवर लागू होतो. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमसारख्या कंपन्यांना हा कर भरावा लागणार आहे. त्यामुळे देशांतर्गत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात तातडीने वाढ होण्याची शक्यता नाही.


केंद्र सरकार दर १५ दिवसांनी आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमती, रिफायनिंग मार्जिन आणि देaशातील इंधनाचा साठा यांचा आढावा घेऊन विंडफॉल टॅक्समध्ये बदल करत असते. याआधी १६ जुलै रोजीही सरकारने डिझेल आणि एटीएफवरील निर्यात शुल्क वाढवले होते, तर पेट्रोलवरील शुल्कात काहीशी कपात केली होती. आता नव्या निर्णयामुळे निर्यातदार कंपन्यांच्या खर्चात वाढ होणार असून देशांतर्गत इंधन उपलब्धतेला प्राधान्य देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Comments
Add Comment

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात

'काशी तमिळ संगमम ५.०'ला सुरुवात, २०७ प्रतिनिधींची पहिली तुकडी विशेष रेल्वेने वाराणसीकडे रवाना

चेन्नई : तमिळनाडू आणि काशी यांच्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक नाते अधिक दृढ करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या