Analog Paneer Ban : राज्यात 'ॲनालॉग पनीर'वर वर्षभर बंदी; FDAचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यात ॲनालॉग (नॉन-डेअरी) पनीरच्या विक्री, साठवण आणि वापरावर पुढील एक वर्षासाठी बंदी घालण्यात आली आहे. अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) याबाबत आदेश जारी केला असून तो राजपत्रातही प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र, नियमानुसार तयार केलेल्या प्रमाणित दुग्धजन्य पनीरच्या विक्रीवर कोणतेही निर्बंध लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. (Analog Paneer)


ॲनालॉग किंवा नॉन-डेअरी पनीर हे दिसायला पनीरसारखे असले तरी त्यामध्ये दुधातील स्निग्धांश किंवा दुग्धघन पूर्णतः अथवा अंशतः काढून त्याऐवजी वनस्पती तेल, वनस्पती स्निग्धांश किंवा इतर दुग्धेतर घटकांचा वापर केला जातो. अशा उत्पादनाची 'पनीर' म्हणून विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास आता बंदी घालण्यात आली आहे. (Analog Paneer Ban)



एफडीएच्या आदेशानुसार, पनीर हा अन्न सुरक्षा नियमांनुसार प्रमाणित दुग्धजन्य पदार्थ आहे. त्यामुळे त्यात दुधातील स्निग्धांशाऐवजी इतर कोणत्याही दुग्धेतर घटकांचा वापर करून तयार केलेले उत्पादन 'पनीर' म्हणून विकता येणार नाही. अशा उत्पादनाला कायद्यानुसार 'दुग्ध संदर्भातील ॲनालॉग' मानले जाईल. (FDA Maharashtra)


या निर्णयाचा सर्वाधिक परिणाम हॉटेल, रेस्टॉरंट, भोजनालये, केटरर्स, क्लाऊड किचन आणि इतर अन्नसेवा आस्थापनांवर होणार आहे. अशा ठिकाणी ॲनालॉग पनीरचा वापर, साठवण, विक्री किंवा ग्राहकांना सेवा देण्यास मनाई करण्यात आली आहे. (Fake Paneer)


तसेच, पनीरचे उत्पादन, पॅकिंग, साठवण, वितरण किंवा विक्री करणाऱ्या सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके (लेबलिंग व प्रदर्शन) विनियम, 2020 नुसार आवश्यक माहिती पॅकेजवर स्पष्टपणे नमूद करणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही एफडीएने दिला आहे. (Dairy Products)

Comments
Add Comment

Jalgaon : जळगावमध्ये भीषण अपघात ! ट्रकच्या धडकेत एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मालदाभाडी गावाजवळ ट्रक आणि दुचाकी

मसाल्यांमध्ये कृत्रिम रंग आणि भेसळीला बंदी; उत्पादक, विक्रेते आणि हॉटेल व्यावसायिकांनाही नियम बंधनकारक

मुंबई : मसाल्यांमधील भेसळ रोखून ग्राहकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन