Nitesh Rane : सिंधुदुर्गातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री नितेश राणे

तांत्रिक अडचणी दूर करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी



मुंबई : 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील ६.२२ लाख पात्र शेतकऱ्यांना एकूण ५ हजार २९ कोटी रुपयांच्या लाभाचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १ हजार ५६९ शेतकऱ्यांना एकूण ७ कोटी ७७ लाख ९८ हजार ६४४ रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळाला असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय, बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली.



या कार्यक्रमादरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यात येणाऱ्या विविध तांत्रिक अडचणी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. जिल्ह्यात मयत झालेले १६९ शेतकरी, देवस्थान किंवा कबुलायतदार प्रकरणांतील ३३९ खातेधारक, संमतीपत्राने वाटप झालेले २१५ शेतकरी आणि इतर कारणांमुळे २४ शेतकरी अशा एकूण ७४७ शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या आहेत. हे शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने शासनाने विशेष सवलत देऊन अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी त्यांनी केली. याशिवाय फार्मर आयडी काढताना येणाऱ्या अडचणी आणि खावटी कर्ज पुरवठ्याबाबतही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, याची ग्वाही त्यांनी दिली.

Comments
Add Comment

Nitesh Rane : 'मोदी एक्सप्रेस'च्या तारखेत बदल

- कोकणवासीयांच्या मागणीनुसार गणपती स्पेशल ट्रेन आता ११ व १३ सप्टेंबरला धावणार; मंत्री नितेश राणे यांची

Mumbai News : मुंबईतील जगजीवन राम रुग्णालयाच्या रक्तपेढीचा परवाना दोन दिवसांसाठी निलंबित

मुंबई : रक्तदानाच्या नोंदींमधील त्रुटी, अपुरे दस्तऐवजीकरण आणि विहित क

Nitesh Rane : सिंधुदुर्गात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी प्रभावी कार्यवाहीचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांची माहिती

कुक्कुटपालनाला 'कृषी समकक्ष' दर्जा दिल्याने युवकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यात

Shri Ganesha Aarogyacha : श्रीगणेशोत्सवात मुंबईतील सार्वजनिक श्रीगणेश मंडळांच्या सभा मंडपात ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ उपक्रम राबविणार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : यंदाच्या श्रीगणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी

Nitesh Rane : मालेगावमध्ये आधुनिक मासळी बाजार उभारणीला गती

- सांगलीतील प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण करण्याचे मंत्री नितेश राणे यांचे निर्देश मुंबई : वाशिम जिल्ह्यातील

Sugar hoarding : साखरेच्या साठेबाजीला आळा; केंद्र सरकारकडून स्टॉक लिमिट २ हजार क्विंटलवर

नवी दिल्ली : केंद्र सरकारने साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी आणि सणांपूर्वी किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर