Ahilyanagar Crime News : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार, मुकादमाच्या मुलावर गुन्हा दाखल

Ahilyanagar Crime News : अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एक संतापजनक घटना घडली आहे. पाथर्डी तालुक्यातील एका गावातील साडेतेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पाथर्डी (Pathardi) तालुक्यात एकच खळबळ उडाली असून संतापाची लाट पसरली आहे. (Ahilyanagar Crime News)



नेमकं प्रकरण काय ?


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील ऊसतोड मजूर असून ते हंगामी कामासाठी बाहेरगावी जात असल्याची माहिती आहे. ऊसतोडीसाठी कामगार पुरविणाऱ्या मुकादमाच्या मुलाची पीडितेशी ओळख झाली होती. संधीचा फायदा साधून मार्च 2026 मध्ये आरोपीने पीडित मुलीला घरातून जबरदस्तीने घेऊन जाऊन एका ठिकाणी डांबून ठेवले. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील न्हावरा येथे नेऊन जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. (Ahilyanagar Crime News)



पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार


दरम्यान, 1 ऑगस्ट रोजी पीडित मुलीने एका अनोळखी महिलेच्या मोबाईलवरून आईशी संपर्क साधला. आपण न्हावरा येथे असल्याची माहिती मोबाईलवरून आईला दिली. त्यानंतर 2 ऑगस्ट रोजी पीडितेच्या आई-वडीलांनी न्हावरा गाठले आणि मुलीला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मुलीने आपल्या आईला आपली आपबिती सांगितली. यानंतर पालकांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी संशयित आरोपी धनंजय आठरे याच्याविरुद्ध बलात्कारासह पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस (Pathardi Police) करत आहेत. मात्र या घटनेनं शहरात खळबळ उडाली आहे.

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी