Sunetra Pawar : आदिवासी हा विकासाचा लाभार्थी नव्हे, तर विकासाला दिशा देणारा समाज!

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; ग्लोबल वॉर्मिगबाबतचा जीवनमंत्र आदिवासींनी शेकडो वर्षांपूर्वी दिला


मुंबई : "आदिवासी समाजाने देशातील जंगलांचे, जलस्रोतांचे आणि जैवविविधतेचे रक्षण करून माणसाला निसर्गाशी सुसंवादाने जगण्याची शिकवण दिली आहे. आज संपूर्ण जगाला भेडसावणाऱ्या वातावरण बदल आणि ग्लोबल वॉर्मिग (जागतिक तापमानवाढ) या संकटावर मात करण्याचा जीवनमंत्र या समाजाने शेकडो वर्षांपूर्वीच आपल्या जीवनपद्धतीतून दिला आहे. म्हणूनच आदिवासी समाज हा विकासाचा लाभार्थी नसून, तो संपूर्ण विकासाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक समाज आहे", असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी शुक्रवारी केले.



जागतिक आदिवासी दिनानिमित्त अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या वतीने आयोजित 'वनरंग आदिवासी संस्कृतीचा गौरव' या तीन दिवसीय उत्सवाचे उद्घाटन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते झाले, त्या वेळी त्या बोलत होत्या. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, मुंबई महिला अध्यक्षा आरती साळवी, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष महेंद्र पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते.


उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, डिजिटल युगातही आपल्या पारंपरिक बोलीभाषा, लोककला, लोकसंगीत आणि हस्तकलेचा वारसा जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. भगवान बिरसा मुंडा, राणी दुर्गावती आणि महाराष्ट्राचे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या योगदानाचा उल्लेख करत, आदिवासी समाजाचा इतिहास हा भारताच्या स्वाभिमानाचा इतिहास असल्याचे त्यांनी सांगितले.



महायुती सरकारने आदिवासी विकास आणि कल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. अजितदादांनी आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने काम केले असून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकार आणि पक्षाच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, रोजगार, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधा प्रत्येक गावापर्यंत पोहोचवण्याचा आमचा निर्धार आहे. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळांचे आधुनिकीकरण, ई-लर्निंग सुविधा, उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती, परदेशी शिक्षणासाठी विशेष योजना आणि स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन यांसारखे उपक्रम राबवले जात आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. नाशिकच्या दिलीप गावित याने ग्लास्को येथील क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत त्यांनी आदिवासी तरुणांच्या क्षमतेचे कौतुक केले.

Comments
Add Comment

Cotton Rate : कापसाच्या दरात तेजीचे संकेत ! भाव 10 हजारांचा टप्पा ओलांडणार? शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या

Cotton Rate : राज्यात यंदा कापूस उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एल निनोचा प्रभाव, पावसातील मोठे

Maharashtra Weather Update: मुंबई-ठाण्यात उष्णतेचा इशारा; कोकणासह देशातील अनेक भागांत पावसाची शक्यता

Maharashtra Weather Update: देशातून नैऋत्य मान्सूनने पूर्णपणे माघार घेतली असली, तरी देशातील हवामानातील बदल सुरूच आहेत. बंगालचा

शाळा प्रवेशासाठी बालकांचे किमान वय निश्चित; २०२७-२८ पासून टप्प्याटप्प्याने लागू होणार नवीन निकष

मुंबई : राज्य शासनाने पूर्व-प्राथमिक ते

समान नागरी संहितेबाबत नागरिकांकडून १५ नोव्हेंबरपर्यंत मागवल्या सूचना; विशेष पोर्टलचा शुभारंभ

महाराष्ट्रात समान नागरी संहिता (UCC) लागू करण्याच्या अनुषंगाने राज्य शासनाने नेमलेल्या समितीने नागरिकांकडून

Maharashtra Weather Update: येत्या पाच दिवसांत हवामानात होणार बदल! उकाड्यापासून होणार सुटका; पहा कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता?

भारतीय हवामान विभागाने (IMD) गुरुवारी जारी केलेल्या हवामान अंदाजानुसार, राज्यातील कोकण विभागात काही ठिकाणी उष्ण

Ban On Firecrackers: दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यास बंदी; मुंबई हायकोर्टाचा आदेश

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयाने गुरुवारी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सार्वजनिक ठिकाणी आणि