Kolhapur News : कोल्हापूरच्या विकासाला मोठी चालना; 1850 कोटींच्या विकासकामांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांना मोठी चालना मिळाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या हस्ते सुमारे 1850 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले. यावेळी कोल्हापूर शहराच्या विकासासाठी हद्दवाढ आवश्यक असल्याचे सांगत, हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या नागरिकांच्या अडचणी सोडवून शहराला टप्प्याटप्प्याने आवश्यक सुविधा दिल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.


प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री चंद्रकांत पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.



या कार्यक्रमात संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीनंतर त्याचे लोकार्पण करण्यात आले. हे नाट्यगृह महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासातील महत्त्वाचे ठिकाण असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. दोन वर्षांपूर्वी लागलेल्या आगीत नाट्यगृहाचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर राज्य सरकारने पुनर्बांधणीसाठी 25 कोटी रुपयांचा निधी दिला. जुन्या वास्तूचे स्वरूप आणि वारसा जपून नाट्यगृहाची पुनर्बांधणी करण्यात आली आहे.


छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाच्या आधुनिकीकरणामुळे कोल्हापूरच्या आरोग्य सेवेत मोठा बदल होणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले. रुग्णालयात आधुनिक ऑपरेशन थिएटर, बर्न वॉर्ड, अपघात विभाग आणि डायलिसिस सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. शेंडा पार्क येथे 600 बेडचे सर्वोपचार रुग्णालय, 250 बेडचे कर्करोग रुग्णालय आणि 250 बेडचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे.


याशिवाय पोलिसांसाठी 414 सदनिका, मेजर ध्यानचंद स्टेडियमवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे हॉकी अॅस्ट्रोटर्फ, महालक्ष्मी मंदिर परिसर विकास, रस्ते, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प आणि पार्किंगसह विविध कामांचे लोकार्पण करण्यात आले. कोल्हापूर-सांगली भागातील पूरस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र रेझिलिएन्स डेव्हलपमेंट प्रोग्रामअंतर्गतही कामे करण्यात येणार आहेत.


कोल्हापूरचा सांस्कृतिक, पर्यटन, क्रीडा आणि औद्योगिक विकास वेगाने व्हावा यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.


Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी