Weather Update : मंगळवारी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

नवी दिल्ली : उद्या म्हणजेच मंगळवारी ११ ऑगस्ट २०२६ रोजी देशातील १७ राज्यांमध्ये पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, कर्नाटक, लक्षद्वीप आणि केरळ या राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.



दिल्ली-एनसीआरसाठी मंगळवारी पावसाचा यलो अलर्ट आहे. संपूर्ण दिल्ली-एनसीआरमध्ये शनिवार १५ ऑगस्ट पर्यंत ढगाळ वातावरण राहील. या काळात राज्यात हलक्या ते मध्यम सरींची शक्यता आहे. मंगळवारी दिल्ली-एनसीआरमध्ये कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसभरात अधूनमधून पावसाच्या सरींची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.



मध्य प्रदेशातील आगर-मालवा, भोपाळ, देवास, इंदूर, मंदसौर, रायसेन, राजगढ, रतलाम, सीहोर, शाजापूर, उज्जैन आणि छोटापूर येथे जोरदार वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यांमध्ये मंगळवारी पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पूर्व उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच पश्चिम उत्तर प्रदेशातही तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. बिहारच्या अनेक जिल्ह्यांसाठीही हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तविला आहे.



उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, केरळ, लक्षद्वीप आणि कर्नाटकमध्ये अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि