Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. रविवारी रात्रीच्या जेवणानंतर विद्यार्थ्यांनी मळमळ, उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरू झाल्याच्या तक्रारी करायला सुरुवात केली. यानंतर विद्यार्थ्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. आतापर्यंत २७ मुलगे आणि ५ मुली अशा एकूण ३२ विद्यार्थ्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.



अन्नातून विषबाधा प्रकरणी रुग्णालय प्रशासनाने प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली. आता १९ विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून, उर्वरित विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.



उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थडके यांच्या मार्गदर्शनाखाली डीएमओ डॉ. प्रसाद नुनेवार, डॉ. सचिन गायकवाड, डॉ. मोहम्मद उस्मान, डॉ. रवी काळे, डॉ. संतोष आत्मलवार, डॉ. संजय लाडके, डॉ. शेख मुजीब, डॉ. काझी तसेच परिचारिका कल्पना दीक्षित व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांवर वेळेत उपचार केले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.



दरम्यान, आश्रमशाळेच्या स्वयंपाकघरातून अनेक पदार्थांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना पुरविण्यात आलेल्या अन्नाची गुणवत्ता, स्वयंपाकघरातील स्वच्छता, अन्नसाठवणुकीची पद्धत तसेच मांसाहारी भोजन तयार करताना अन्नसुरक्षेचे निकष पाळण्यात आले होते का, याबाबत चौकशीची मागणी होत आहे.

Comments
Add Comment

राज्यातील १०२ आणि १०८ रुग्णवाहिका सेवांचे होणार एकत्रीकरण - वर्ष अखेरीस ४ हजार ५०० नव्या रुग्णवाहिका

मुंबई : राज्यातील आपत्कालीन आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि वेगवान करण्यासाठी १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांचे

Pratap Sarnaik : एसटीचा १५ टक्के हंगामी भाडेवाढीचा प्रस्ताव नामंजूर, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना दिलासा; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय

मुंबई : दुष्काळ आणि महागाईमुळे आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना दिलासा देण्यासाठी एसटी

Maharashtra weather : महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा अंदाज; कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता, मुंबईत उकाडा वाढणार

मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे उष्णतेचा तडाखा वाढत असताना दुसरीकडे काही भागांत अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट

विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत सहकार मंत्र्यांची बैठक, ऊस उत्पादकांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयासाठी सरकार प्रयत्नशील

मुंबई: राज्यातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यासाठी राज्य शासन

महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला नवी झेप; ह्युंदाई मोटर प्रकल्पाचे पुण्यात दिमाखात उद्घाटन, मंत्री उदय सामंत काय म्हणाले?

पुणे :

Jayakumar Rawal : शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! सोयाबीन, तूर, उडदाला किती मिळणार हमीभाव? 950 खरेदी केंद्रे सज्ज

मुंबई : केंद्र शासनाच्या हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2026-27 मध्ये सोयाबीन, मूग, उडीद व तूर खरेदीसाठी