Snakebite In Gadchiroli : गडचिरोलीत सर्पदंशामुळे ३ मुलींचा मृत्यू, ३ मुलींना एअरसिफ्ट करून रुग्णालयात केले दाखल

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानीत आश्रमशाळेत रात्री गाढ झोपलेल्या सहा मुलींना सर्पदंश झाल्याची घटना घडली. सर्पदंशामुळे सहा पैकी तीन मुलींचा मृत्यू झाला. इतर तीन मुलींची प्रकृती गंभीर आहे. या तिघींना एअरलिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुलींवर उपचार सुरू आहेत.



जपतलाई ​येथे कुप्पा लिंगो शैक्षणिक व संस्कृती विकास संशोधन शाळा तथा अनुदानित आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाची घटना घडली. सर्पदंशामुळे सुश्मिता सरोजित मंडल (वय १४), दीपिका एतवा लकडा (वय १२), अनु गजुराम कोरेटी (वय ८) यांचा मृत्यू झाला. तर दीपिका बिटलूरसाय मडावी (वय ११), ​समृद्धी सुरेश नैताम (वय १४), ​कविता राजकुमार किरंगा (वय १२) यांच्यावर उपचार सुरू आहेत.



आश्रमशाळेत मुली जमिनीवर अंथरलेल्या गाद्यांवर झोपतात. यामुळेच साप आल्याचे त्यांना समजले नाही. जेव्हा सर्पदंशाची घटना घडली त्यावेळी वसतिगृहाच्या महिला अधीक्षक गैरहजर होत्या.


संस्थापक आणि प्रकल्प अधिकारी सुरक्षित वातावरणात वावरत असताना मुलींसाठी एवढे असुरक्षित वातावरण कसे असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. सर्पदंश प्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशीही मागणी जोर धरू लागली आहे.



आश्रमशाळेत सुरक्षित वातावरण नसल्यामुळेच तीन मुलींचा जीव गेला आहे. या प्रकरणी प्रकल्प अधिकाऱ्याला तातडीने निलंबित अशी मागणी होऊ लागली आहे.

Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.