BMC News : महापालिकेतील नगरसेवकांना हवाय १ कोटींचा निधी

- नगरसेवक स्वेच्छा निधीची मर्यादा ६० लाखांवरून १ कोटींची करण्याची मागणी


- भाजप नगरसेविकेने केली महापालिकेत मागणी


मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत नगरसेवकांना टॅब देण्याची सुरु असलेली प्रक्रिया आणि त्याला विरोध होत असतानाच आता भाजपच्या नगरसेविकेने नगरसेवक स्वेच्छा निधीमध्ये वाढ करण्याची मागणी केली आहे. सध्या नगरसेवकांना आपल्या प्रभागातील सेवा सुविधांची कामे करण्यासाठी ६० लाख रुपयांचा निधीची तरतूद केली जाते. परंतु हा ६० लाख रुपयांचा निधी वाढवून १ कोटी रुपये केला जावा अशी मागणी ठरावाच्या सूचनेद्वारे केली आहे. (BMC News)



भाजपच्या नगरसेविका आश्विनी मते यांनी महापालिका सभागृहात ठरावाच्या सूचनेद्वारे ही मागणी करताना, सध्या प्रत्येक नगरसेवकाला दरवर्षी ६० लाख रुपये एवढा नगरसेवक स्वेच्छा निधी उपलब्ध करुन दिला जातो. पण , प्रभागातील रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, सार्वजनिक प्रसाधनगृहे, उद्यान सुशोभीकरण तसेच अन्य तातडीच्या नागरी कामांसाठी उपलब्ध होणारा हा निधी अत्यंत अपुरा पडत आहे. वाढत्या महागाईमुळे साहित्याचे दर तसेच मजुरीच्या खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, त्यामुळे ६० लाख रुपयांच्या मर्यादित निधीतून प्रभागातील अनेक महत्त्वाची विकासकामे पूर्ण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक उत्तम नागरी सुविधा उपलब्ध नगरसेवक स्वेच्छा निधीची वार्षिक मर्यादा ६० लाख रुपयांवरुन वाढवून १ कोटी रुपये करण्यात यावी. जेणेकरून मुंबईकर नागरिकांना अधिकाधिक उत्तम नागरी सुविधा करून देणे शक्य होईल,असे मते यांनी नमुद केले आहे. (BMC News)



अश्विनी मते यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात मोठी व आर्थिकदृष्टया संपन्न महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. त्यामुळे नगरसेवक निधीतून नागरिकांच्या अपेक्षेनुसार ही कामे जलदगतीने व दर्जेदार पध्दतीने पूर्ण करता ये नाही. अशाप्रकारे ही कामे करता यावी यासाठी नगरसेवकांना उपलब्ध करुन दिलेल्या नगरसेवक निधीच्या मर्यादेत वाढ करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (BMC News)

Comments
Add Comment

Tiger Shroff: टायगर श्रॉफच्या गाडीवर मुंबईत गोळीबार! सुदैवाने अभिनेता सुरक्षित; लॉरेन्स बिश्नोई गँगचा कथित दावा?

मुंबई: बॉलिवूड चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अभिनेता टायगर

CSMT स्थानकातून एक वर्षाच्या चिमुरडीचं अपहरण, भीक मागण्यासाठी महिलेचा धक्कादायक प्रकार!

मुंबई: शुक्रवारी पहाटे मुंबई सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या मुख्य सभागृहामध्ये ट्रेनची वाट पाहत बसलेल्या असताना

Mumbai Crime News : ओला कारमधून उतरले अन् थेट गोळीबार! वडाळ्यात नेमकं काय घडलं?

वडाळा: मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळ शनिवारी रात्री गोळीबाराची घटना घडली. ओला कॅबमधून

Flex Free Mumbai : फ्लेक्समुक्त मुंबई… महापौर निघाल्या मैलाचा दगड पार करायला!

सचिन धानजी मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी अनधिकृत फ्लेक्स बॅनर्स, पोस्टर्स आणि स्टिकर्स हटविण्यासाठी

BMC Banner Removal Drive : मागील १५ दिवसांमध्ये ५२ हजार ४४८ बॅनर, फ्लेक्स, पोस्टर्स हटवले

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईचे विद्रूपीकरण रोखण्यासाठी आणि सार्वजनिक ठिकाणी अनधिकृत जाहिरात फलक

Mumbai Footpath Encroachment : पदपथांचा व्यावसायिक वापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार, महापालिका आयुक्तांनी दिले कारवाईचे थेट आदेश

मुंबई (विशेष प्रतिनिधी) पदपथांचा कोणत्याही प्रकारे व्यावसायिक वापर होता कामा नये, काटेकोर दक्षता घ्यावी.