Sheikh Hasina : बांगलादेशमधील हालचालींना वेग? RAW प्रमुखांनी घेतली पंतप्रधान तारिक यांच्या संरक्षण सल्लागारांशी भेट; शेख हसीनांच्या परतीचा मार्ग मोकळा?

नवी दिल्ली : बांग्लादेशातील राजकीय घडामोडींना आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. भारताची गुप्तचर संस्था रिसर्च अँड अॅनालिसिस विंग (RAW) चे प्रमुख पराग जैन यांनी बांग्लादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांचे संरक्षण सल्लागार ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) डॉ. एकेएम शम्सुल इस्लाम यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, याच दिवशी भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनीही पंतप्रधान तारिक रहमान यांची स्वतंत्र भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. या दोन उच्चस्तरीय भेटींमुळे भारत-बांग्लादेश संबंध आणि विशेषतः माजी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य बांग्लादेश वापसीबाबत चर्चा सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत.



RAW प्रमुखांच्या नेतृत्वाखाली चार सदस्यीय शिष्टमंडळ ढाक्यात :


RAW प्रमुख पराग जैन यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांचे चार सदस्यीय शिष्टमंडळ रविवारी दुपारी अधिकृत दौऱ्यावर ढाका येथे पोहोचले. बांग्लादेशच्या डायरेक्टरेट जनरल ऑफ फोर्सेस इंटेलिजन्स (DGFI) या प्रमुख लष्करी गुप्तचर संस्थेच्या निमंत्रणावरून हे शिष्टमंडळ बांग्लादेशात गेल्याचे सांगण्यात येत आहे.


या शिष्टमंडळात पराग जैन यांच्यासह अश्विन मुकुंद कोटनीस, राहुल नेगी आणि शैबल रॉय चौधरी यांचा समावेश असल्याची माहिती आहे. शिष्टमंडळाने ढाका येथील हजरत शाह जलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बांग्लादेशमध्ये प्रवेश केला.



हसीनांच्या परतीमुळे भेटीला महत्त्व :


भारत आणि बांग्लादेशच्या गुप्तचर संस्थांमधील अधिकाऱ्यांच्या बैठका यापूर्वीही होत आल्या आहेत. मात्र, सध्याच्या राजकीय परिस्थितीत या भेटींकडे विशेष महत्त्वाने पाहिले जात आहे. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी ५ ऑगस्ट २०२४ रोजी बांग्लादेश सोडल्यानंतर भारतात वास्तव्य केले आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी बांग्लादेशात परतण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली आहे. नुकतेच त्यांनी नवी दिल्ली येथून माध्यमांशी ऑनलाइन संवाद साधताना डिसेंबरपर्यंत मायदेशी परतण्याबाबत भाष्य केल्याचा दावा करण्यात आला आहे.



हसीनांच्या परतीची तारीख आणि सुरक्षेवर चर्चा?


काही माध्यमांच्या सूत्रांनुसार, ढाका येथे पोहोचलेल्या भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य बांग्लादेश वापसीची प्रक्रिया, तारीख आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत चर्चा केल्याचा दावा केला आहे. या चर्चेबाबत अधिकृतपणे कोणतीही सविस्तर माहिती समोर आलेली नाही. तसेच शेख हसीना यांच्या परतीबाबत भारत किंवा बांग्लादेश सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.


मात्र, काही अहवालांमध्ये भारतीय सुरक्षा अधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बांग्लादेशच्या पंतप्रधान कार्यालयात तारिक रहमान यांची भेट घेतल्याचा दावा करण्यात आला आहे.



BRICS परिषदेनंतर हसीनांची वापसी?


सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध झालेल्या अहवालांमध्ये तारिक रहमान यांच्या BRICS शिखर परिषदेनंतर शेख हसीना (Sheikh Hasina) बांग्लादेशात परतण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, BRICS शिखर परिषदेच्या संदर्भातील परिस्थितीबाबतही अनिश्चितता असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे हसीना नेमक्या कधी आणि कोणत्या परिस्थितीत बांग्लादेशात परतणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही.



एका दिवसात दोन महत्त्वाच्या भेटी :


विशेष म्हणजे, RAW प्रमुखांची बांग्लादेशच्या संरक्षण सल्लागारांशी भेट आणि त्याच दिवशी भारतीय उच्चायुक्तांची पंतप्रधान तारिक रहमान यांच्याशी भेट झाल्याने या दौऱ्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन्ही देशांच्या सुरक्षा आणि राजनैतिक पातळीवरील या बैठकांमध्ये सीमा सुरक्षा, दहशतवाद, गुप्तचर सहकार्य आणि बांग्लादेशातील सध्याची राजकीय परिस्थिती यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा झाली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, बैठकीतील चर्चेचे अधिकृत तपशील अद्याप सार्वजनिक करण्यात आलेले नाहीत.


दरम्यान, शेख हसीना (Sheikh Hasina) यांच्या संभाव्य परतीबाबतचे वृत्त अद्याप सूत्रांवर आधारित दाव्यांपुरतेच मर्यादित असून, त्यांच्या बांग्लादेश वापसीची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही.

Comments
Add Comment

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि