Air India Phuket Delhi : बाप रे...! नशा करून पायलेटची हवेत स्वारी; एअर इंडियाच्या विमानातील कॅप्टनची दुसरी डोप टेस्टही पॉझिटिव्ह

नवी दिल्ली : एअर इंडियाच्या (Air India) फुकेट-दिल्ली विमानाशी संबंधित तपासात नवी माहिती समोर आली आहे. 4 ऑगस्ट रोजी AI-2379 या विमानाने फुकेटहून दिल्लीकडे येत असताना अचानक उंची गमावली होती. विमान काही क्षणांत जवळपास 300 फूट खाली आले. या घटनेमुळे विमानातील प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली होती. मात्र वैमानिकांनी परिस्थिती नियंत्रणात आणत विमान दिल्ली विमानतळावर सुरक्षित उतरवले.


या घटनेच्या तपासादरम्यान विमानाच्या कॅप्टनची डोप टेस्ट करण्यात आली होती. त्याची पहिली स्क्रीनिंग टेस्ट non-negative आली होती. त्यानंतर नियमांनुसार कॅप्टनच्या नमुन्याची पुढील तपासणी करण्यात आली. आता या दुसऱ्या म्हणजेच confirmatory चाचणीतही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.



पहिल्या चाचणीनंतर नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आला होता. दोन्ही चाचण्यांमध्ये सकारात्मक निकाल आल्याने तपास यंत्रणांकडून या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. तपास पूर्ण होईपर्यंत विमानातील दोन्ही वैमानिकांना फ्लाइंग रोस्टरमधून दूर ठेवण्यात आले आहे.


कॅप्टनच्या डोप टेस्टच्या अहवालाचा विमान अचानक खाली येण्याच्या घटनेशी काही संबंध आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. या उड्डाणादरम्यान विमानाच्या ऑटोपायलटमध्ये अचानक बिघाड होऊन तो डिस्कनेक्ट झाल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. त्यामुळे या घटनेमागे वैमानिकाशी संबंधित कारण होते की तांत्रिक बिघाड, याचा शोध घेतला जात आहे.


या प्रकरणाचा तपास Aircraft Accident Investigation Bureau म्हणजेच AAIB कडून ICAO Annex 13 मधील नियमांनुसार केला जात आहे. तपासात फ्रान्सची विमान अपघात तपास संस्था BEA आणि Airbus कंपनीच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे.


Airbus A320 हे विमान फ्रान्समध्ये तयार झाले असल्याने BEA या तपासात सहभागी होत आहे. Airbus कडूनही तपास यंत्रणांना तांत्रिक मदत दिली जात आहे. घटनेची सर्व कारणे तपासल्यानंतरच विमान अचानक उंची गमावण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.


मागील आठवड्यात या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या प्रवासात अनेक प्रवाशी आणि कर्मचारी जखमी झाले होते. या घटनेचा पुढील तपास अद्याप सुरु आहे.
Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि