Jalgaon Crime News : खाऊचे आमिष अन् अल्पवयीन मुलीवर वर्षभर अत्याचार ; चार संशयितांना अटक

Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यात अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वर्षभर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपाने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात ( Varangaon Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलिसांनी चार संशयितांना अटक केली आहे. तर एका विधीसंघर्षित मुलाविरुद्धही बाल न्याय व्यवस्थेनुसार कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. संबंधितांविरुद्ध वरणगाव पोलीस ठाण्यात ( Varangaon Police Station ) गुन्हा दाखल करण्यात आला. (Bhusawal Crime News)



खाऊचे आमिष अन् मुलीवर वर्षभर अत्याचार


पीडित मुलगी ही अवघ्या १३ वर्षांची आहे. तक्रारीनुसार, संशयितांनी तिला वेळोवेळी खाऊसाठी पैसे देण्याचे आमिष दाखविले. या आमिषातून तिच्याशी संपर्क वाढवला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. सुमारे वर्षभराच्या कालावधीत वेगवेगळ्या प्रसंगी संशयितांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. (Bhusawal Crime News)



चार संशयित पोलिसांच्या ताब्यात


पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, हा प्रकार एकाच घटनेपुरता मर्यादित नसून वेगवेगळ्या प्रसंगी घडल्याचा आरोप आहे. संशयितांनी स्वतंत्रपणे अत्याचार केल्याचे धक्कादायक वास्तव तपासात समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणात सामूहिक बलात्काराचे कलम लावले नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर वरणगाव पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाला सुरुवात केल्यानंतर तक्रारीतील माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला आहे. चार संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची घटनेच्या अनुषंगाने कसून चौकशी केली जात आहे. (Bhusawal Crime News)



वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल


अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचे देखील नाव समोर आले आहे. संशयित मुलावर प्रचलित बाल न्याय व्यवस्थेतील तरतुदींनुसार कार्यवाही केली जात आहे. तपासात समोर येणाऱ्या पुराव्यांनुसार प्रकरणातील पुढील कायदेशीर कारवाई निश्चित केली जाणार आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख कायद्यानुसार गोपनीय ठेवण्यात आली आहे. तसेच संवेदनशील प्रकरण असल्याने तपासातील अधिकृत माहितीशिवाय इतर कोणत्याही चर्चेवर विश्वास ठेवू नये, असे पोलिसांकडून ( Varangaon Police Station ) आवाहन करण्यात आले आहे. (Bhusawal Crime News)


दरम्यान या घटनेने मुलींच्या सुरक्षततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


 
Comments
Add Comment

Dagdusheth Halwai Ganpati : कारगिल, जम्मू, अयोध्या, राजस्थानसह सीमावर्ती भागात ‘दगडूशेठ’ गणपतीची प्रतिष्ठापना

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात प्रसिद्ध असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची (Dagdusheth Halwai Ganpati) भक्ती देशाच्या सीमेवर

MahaBhumi Stack : आता एका क्लिकवर मिळणार जमीन सर्च रिपोर्ट! महाराष्ट्रात महाभूमी स्टॅकचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील जमीन व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुलभ करण्यासाठी महसूल व वन विभागाने ‘महाभूमी स्टॅक’ ही

Dr Sampada Munde Case : डॉ. संपदा मुंडे आत्महत्येप्रकरणी छाननी समिती स्थापन

मुंबई : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नेमण्यात

Maharashtra Weather Update : सप्टेंबरच्या सुरुवातीलाच हवामान बदलणार; विदर्भात जोरदार पावसाची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्यात पावसाने काहीशी ओढ दिल्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला हवामानात बदल

Jalgaon : काल वाढदिवस...आज काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश, चिमुकल्याला झोळीत गळफास

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे अत्यंत धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पहिल्या वाढदिवस ,

Medha Kulkarani : धार्मिक उत्सवात अशा कार्यक्रमांची गरज काय...; गणेशोत्सवात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमावरून वाद

पुणे : महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या आणि श्रद्धेने साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला राज्यभरात सुरुवात झाली आहे.