Mumbai Goa Highway News : गणेशोत्सवापूर्वी मुंबई-गोवा महामार्गावरील कामांना वेग; ३१ ऑगस्टपर्यंत चार उड्डाणपुलांची कामे पूर्ण करण्याचे निर्देश

मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांचा प्रवास सुरक्षित आणि कोंडीमुक्त करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांना आता वेग देण्यात येणार आहे. केवळ कामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामाला गती देण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.


मंत्रालयात मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठक झाली. यावेळी कोलाड, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी प्रत्यक्ष दिसतील अशा पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गणेशोत्सव काळात महामार्गावरील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी प्रलंबित कामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये, अशी सूचना करण्यात आली. ( Mumbai Goa Highway)



दरम्यान, नागोठणे उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामासाठी आयआयटीची तांत्रिक मदत घेण्यात येत आहे. तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू केले जाणार असून, तोपर्यंत पुलाच्या दोन्ही बाजूंच्या महामार्गाची दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


माणगाव बायपासवरील सुमारे ७.५ किलोमीटरपैकी ५.५ किलोमीटर मार्गावर २० ऑगस्टपासून एकेरी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर रेल्वे पुलावर गर्डर टाकण्याचे काम हाती घेतले जाणार असून, ते पूर्ण झाल्यानंतर उर्वरित दोन किलोमीटर मार्गही वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.


चिपळूण उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले असून गर्डर टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. पावसाने साथ दिल्यास गणेशोत्सवापूर्वी हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.


मुंबई, ठाणे, पुणे आणि राज्याच्या इतर भागांतून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेशोत्सव काळात सुरक्षित व सुरळीत प्रवास करता यावा, यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने आणि निश्चित मुदतीत कामे पूर्ण करावीत, असे मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment

Neelam Gorhe : भटके-विमुक्त समाजाने शिक्षणाच्या बळावर प्रगती साधावी : डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे : भटके-विमुक्त समाजाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. या योजनांचा

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात; 65 वर्षीय प्रवाशाचा मृत्यू, 10 जण जखमी

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात

Nagpur News : नागपुरात खळबळ! नामांकित 18 शाळांना एकाच वेळी अचानक सुट्टी जाहीर; 'या' धक्कादायक कारणामुळे पालक धास्तावले

नागपूर : नागपूर शहरातील काही नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देणारे ईमेल मिळाल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Samruddhi Mahamarg : समृद्धी महामार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! ३१ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरपर्यंत ठराविक वेळेत वाहतूक बंद

मुंबई : समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आहे. मुंबई-नागपूर समृद्धी