Tuesday, September 1, 2026

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?

INDvsSL : भारत - श्रीलंका कसोटीच्या वेळेबाबत मोठा निर्णय, गॉल कसोटीत रविवारचा खेळ किती वाजता सुरू होणार ?
गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात गॉल येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्यात रविवारी सकाळी ९.४५ वाजता खेळ सुरू होणार आहे. याआधी शनिवारी कसोटीच्या पहिल्या दिवशी खेळ सकाळी दहा वाजता सुरू झाला होता. पावसामुळे पहिल्या दिवशी बराच वेळ वाया गेल्यामुळे रविवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी खेळ दहा ऐवजी सकाळी ९.४५ वाजता सुरू करण्याचा निर्णय झाला आहे. एरवी कसोटी सामन्यात दररोज ९० षटके टाकणे अपेक्षित असते. पण गॉल कसोटीत पहिल्या दिवशी पावसामुळे बराच वेळ वाया गेल्यामुळे रविवारी ९८ षटके टाकण्याचे नियोजन आहे. श्रीलंकेत दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरू असलेल्या या कसोटी मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला जात आहे. गॉल कसोटीत नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय पहिल्या दिवशी भारतासाठी फायद्याचा ठरला. भारतीय संघाने पहिल्या दिवशी ७३ षटकांत दोन बाद २८८ धावा केल्या. आता दुसऱ्या दिवशी धावा काढण्याचा वेग वाढवून भारतीय संघ श्रीलंकेवरील दबाव वाढवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे तर श्रीलंका भारताची कोंडी करून लवकर विकेट मिळवण्याचा प्रयत्न करेल अशी शक्यता आहे. संक्षिप्त धावफलक : गॉल कसोटी, पहिला दिवसाचा खेळ संपला; भारत २ बाद २८८ धावा. यशस्वी जयस्वाल ३२ धावा (धावचीत), केएल राहुल ७७ धावा (रिटायर्ड हर्ट), देवदत्त पडिक्कल नाबाद १३१ धावा, शुभमन गिल १६ धावा, ऋषभ पंत नाबाद २७ धावा. श्रीलंकेकडून प्रभात जयसूर्याने घेतली एक विकेट.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा