Air India Express : एअर इंडिया एक्सप्रेसच्या प्रवाशाने केला विमानतळावर गोळीबार; २ जण जखमी

वाराणसी : रविवार १६ ऑगस्ट रोजी सकाळी लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर शस्त्र तपासणीदरम्यान एका प्रवाशाच्या परवानाधारक पिस्तुलातून चुकून गोळी सुटल्याने दोन AAICLAS तपासनीस जखमी झाले. सकाळी सुमारे ९:३० वाजता ही घटना घडली, त्यावेळी तो प्रवासी आपल्या पत्नीसोबत एअर इंडिया एक्सप्रेसच्या IX-1810 या मुंबईला जाणाऱ्या विमानाने प्रवास करत होता. (Air India Express)



शस्त्र तपासणीदरम्यान झाला गोळीबार


वाराणसी विमानतळ संचालकांच्या म्हणण्यानुसार, या प्रवाशाने विमानात चढण्यापूर्वी आपल्याकडे शस्त्रे असल्याचे सांगितले होते. अनिवार्य शस्त्र तपासणीदरम्यान, पिस्तुलातून एक गोळी झाडण्यात आली, ज्यात AAICLAS (AAI कार्गो लॉजिस्टिक्स अँड अलाइड सर्व्हिसेस) चे दोन तपासणी कर्मचारी जखमी झाले.  (Varanasi Airport)



हल्ल्यात जखमी झालेल्या दोन्ही कर्मचाऱ्यांना उपचाराकरिता तातडीने न्यू लक्ष्मी ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात आले. घडलेल्या घटनेबाबत स्थानिक पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून, गोळीबार प्रकरणाची कसून चौकशी होणार आहे.


समोर आलेल्या माहितीच्या आधारे, प्रवाशाची ओळख आझमगड येथील रहिवासी, अंदाजे ५५ वर्षीय कमलेश राय अशी पटली असून, तो आपल्या पत्नीसोबत मुंबईला प्रवास करत होता.


अहवालांनुसार, शस्त्र तपासणीमध्ये शस्त्र, संबंधित कागदपत्रे आणि दारूगोळ्याची पडताळणी करण्यात आली. गोळी दोन कर्मचाऱ्यांना लागण्यापूर्वी आधी जमिनीवर आदळली होती. जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका महिलेच्या मांडीला किंवा पायाला दुखापत झाली आहे, तर एका पुरुष तपासनीसाच्या हाताला किंवा अंगठ्याला दुखापत झाली आहे. (Air India Express)



तपासात काय समोर आले?


तपासणीदरम्यान बंदुकीतून गोळी कशी सुटली यायाबाबत, प्रवाशाला ताब्यात घेऊन त्याची चौकशी करण्यात आली. विमानतळ संचालक पुनीत गुप्ता यांनी पोलिसांना माहिती देण्यात आल्याचे आणि तपास सुरू असल्याचे सांगितले. प्राथमिक अहवालांनुसार हा गोळीबार चुकून झाल्याचे सांगितले जात आहे. आता पोलीस या गोळीबाराचा घटनाक्रम व शस्त्र तपासणी प्रक्रियेच्या कार्यपद्धतीचा कसून तपास करत आहेत. (Varanasi Airport)

Comments
Add Comment

Indus Water Treaty : सिंधू जल करार स्थगितच राहणार; आर्बिट्रेशन कोर्टाच्या निर्णयाला भारताचा विरोध

नवी दिल्ली : भारताने सोमवारी सिंधू जल कराराबाबत जागतिक बँकेच्या मध्यस्थीने स्थापन करण्यात आलेल्या कोर्ट ऑफ

Tata Javelin Missile : भारतात टाटा बनवणार टँकविरोधी मिसाईल सिस्टीम जॅव्हलिन; अमेरिकन कंपनीसोबत करार

नवी दिल्ली : भारताने अमेरिकेकडून टँकविरोधी मिसाईल सिस्टीम एफजीएम-148 जॅव्हलिन खरेदी करण्याचा करार केला आहे.

Kiren Rijiju : न्यूयॉर्कमध्ये भारतीय राष्ट्रध्वजाच्या अवमानावर किरेन रिजिजू संतप्त

नवी दिल्ली : न्यूयॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे झालेल्या निदर्शनांदरम्यान भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Greater Noida Accident : ग्रेटर नोएडात भीषण अपघात; ट्रेलर डिव्हायडर तोडून कारवर आदळला, 4 जणांचा मृत्यू

ग्रेटर नोएडा : ग्रेटर नोएडातील जेवर परिसरात यमुना एक्सप्रेसवेवर रविवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 4 जणांचा

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा