Weather Alert India : देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; नेमका कुठे आणि कसा पाऊस पडणार? जाणून घ्या

नवी दिल्ली : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे देशातील अनेक भागांत मान्सून सक्रिय झाला असून, पुढील काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) रविवारी उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली-एनसीआर, राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंडमधील विविध भागांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. (Weather Alert India)

उत्तर प्रदेशात संततधार पावसामुळे गंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली असून, वाराणसीतील अनेक छोटी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांत रविवारी पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या आणि सखल भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दिल्ली-एनसीआरमध्येही रविवारी पावसाची शक्यता असून, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेल्या दमट उष्णतेपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पावसानंतर पुन्हा आर्द्रता वाढू शकते. (Weather)


डोंगराळ राज्यांमध्ये भूस्खलनाचा धोका


उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीरमध्येही मान्सून सक्रिय आहे. उत्तराखंडमधील काही भागांत पावसामुळे भूस्खलनाच्या घटना घडल्या असून, काही मार्गांवरील वाहतुकीवर परिणाम झाला आहे. डेहराडून, नैनिताल, चमोली, पिथोरगड, रुद्रप्रयाग यांसह विविध जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशातील कुल्लू, मनाली, कांग्रा, सोलन आदी भागांतही पावसाचा अंदाज आहे.

बिहार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्येही पाऊस


बिहारमध्ये पाटणा, पश्चिम चंपारण, गया, भागलपूर, पूर्णिया, किशनगंज, कटिहार यांसह अनेक जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे. मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र आणि मान्सूनच्या स्थितीमुळे भोपाळ, जबलपूर, रीवा आणि शहडोल विभागात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. छत्तीसगडमध्येही रायपूर, बिलासपूर आणि सुरगुजा विभागांत पाऊस अपेक्षित आहे. (Monsoon)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पश्चिम बंगाल, उत्तर ओडिशा आणि झारखंडमधील गंगा मैदानी भागात पुढील काही दिवस मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. 17 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. पश्चिम हिमालयीन प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे आणि डोंगराळ भागात अनावश्यक प्रवास टाळावा. (IMD)
Comments
Add Comment

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि

Dr. Koyyala Ruth John Paul: संघर्षातून यशाकडे! भारतातील तृतीयपंथीयांचा वैद्यकीय क्षेत्रात नवा इतिहास

मुंबई: तृतीयपंथातील अनेक व्यक्तींना आजही सामाजिक भेदभाव, शिक्षणातील अडचणी, रोजगाराच्या मर्यादित संधी आणि

Global Handwashing Day 2026 : हातांच्या स्वच्छतेबाबत आयुर्वेद काय सांगतो ? जाणून घ्या रोजच्या आरोग्याची गुरुकिल्ली!

आपण आपलं आरोग्य उत्तम राहावं म्हणून रोजच्या आयुष्यात अनेक छोट्या-छोट्या गोष्टींची काळजी घेतो. पण यातली सर्वात

NHRC Internship 2026: विद्यार्थ्यांसाठी खास संधी! राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडून इंटर्नशिप कार्यक्रम जाहीर; कसा कराल अर्ज?

राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (NHRC) आपल्या हिवाळी इंटर्नशिप प्रोग्रॅम २०२६ साठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप चार

एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर येथे आपत्कालीन लँडिंग; नेमकं काय घडलं?

जर्मनीच्या फ्रेंकफर्ट येथून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे जयपूर एयरपोर्टवर आपत्कालीन लँडिंग