Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार


मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) अंतर्गत महाराष्ट्राच्या कृषी विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची केंद्र सरकारने दखल घेतली आहे. या कामगिरीबद्दल महाराष्ट्राची राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून, २४ आणि २५ ऑगस्ट २०२६ रोजी नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे होणाऱ्या पीएमएफएमई कॉन्क्लेव्हमध्ये महाराष्ट्राचा गौरव करण्यात येणार आहे. (Maharashtra Agriculture Department)


राज्याच्या वतीने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे हे केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषी विभागासाठी हा अभिमानाचा क्षण ठरणार आहे.



कामगिरीच्या मूल्यांकनात महाराष्ट्र अव्वल :


केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पीएमएफएमई योजनेतील कामगिरीचे ठरवून दिलेल्या निकषांनुसार मूल्यांकन केले. या मूल्यांकनात महाराष्ट्राने एकूण कामगिरीच्या आधारे उल्लेखनीय स्थान मिळवले. त्यानंतर राष्ट्रीय पुरस्कारासाठी महाराष्ट्राची निवड करण्यात आली. याबाबत केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने महाराष्ट्राच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिवांना पत्राद्वारे माहिती दिली आहे. (Maharashtra Agriculture Department)



३१ हजारांहून अधिक प्रकल्पांना मंजुरी :


कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमएफएमई योजनेअंतर्गत महाराष्ट्रात आतापर्यंत ३१,७४६ प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे. यापैकी तब्बल १७,७८६ प्रकल्प महिला उद्योजकांचे आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यात सुमारे १०.५६ लाख मनुष्यदिन रोजगार, १८ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता आणि तब्बल ₹३,१३५ कोटींची गुंतवणूक निर्माण झाली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ₹७१५ कोटींचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. (Maharashtra Agriculture Department)



महिला उद्योजक आणि ग्रामीण उद्योगांना मोठी चालना :


पीएमएफएमई योजना सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना आर्थिक आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या उद्देशाने राबवली जाते. या माध्यमातून शेतकरी, महिला बचत गट, लघु उद्योजक तसेच ग्रामीण भागातील अन्न प्रक्रिया उद्योगांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील मोठ्या संख्येने महिला उद्योजकांना या योजनेचा लाभ मिळाल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि महिला उद्योजकतेला चालना मिळाल्याचे चित्र आहे. (Maharashtra Agriculture Department)



कृषी विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे योगदान :


कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या यशाचे श्रेय कृषी विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण आणि अथक प्रयत्नांमुळे पीएमएफएमई योजनेची राज्यात प्रभावी अंमलबजावणी शक्य झाली आणि महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभाग सातत्याने काम करत असल्याचेही भरणे यांनी नमूद केले. (Maharashtra Agriculture Department)



महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण :


ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती, महिला उद्योजकांना प्रोत्साहन आणि शेतमालाच्या प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्राने केलेल्या प्रयत्नांना केंद्र सरकारकडून मिळालेला हा सन्मान महत्त्वाचा मानला जात आहे. २४ ऑगस्ट रोजी नवी दिल्लीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे महाराष्ट्राच्या वतीने हा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारणार असल्याने कृषी विभागासह संपूर्ण राज्यासाठी हा गौरवाचा क्षण ठरणार आहे. (Maharashtra Agriculture Department)

Comments
Add Comment

Devendra Fadnavis : सुट्या खाद्य तेलाच्या विक्रीस वर्षभराची मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

पारंपरिक व्यावसायिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी समिती स्थापन करणार मुंबई : अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए)

Ashish Shelar : दहिसर 'ट्रान्सपोर्ट हब'च्या कामादरम्यान 'ब्लास्टिंग' नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करा!

- पालकमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; बाधित इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, खनिज वाहतुकीची चौकशी करावी मुंबई : दहिसर

Devendra Fadnavis : मंत्री नितेश राणे, संग्राम जगताप, महेश लांडगे हे हिंदू नायक, त्यांनी पुढेही हिंदुत्वासाठीच काम केले पाहिजे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकोद्गार

मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री नितेश राणे, आमदार संग्राम जगताप आणि महेश लांडगे हे तिघेही हिंदू नायक असून

AndheriNews : वीरा देसाई रोड, जे.पी, रोड, आझाद नगरमधील आता तुंबणार पाण्यातून होणार सुटका

मोगरा नाल्यातील प्रवाह आता वळवणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई रोड, जे.पी.रोड आणि आझाद

BMC : मोठ्या मंडळांसाठी समन्वय अधिकारी नेमा; समन्वय समितीची महापालिकेकडे मागणी!

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईत मोठ्याप्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, अशा मंडळांसाठी महापालिकेने समन्वय

Malad Accident : "तिला मला शेवटचं पाहायचं आहे..."; जखमी पतीने व्हीलचेअरवरून घेतले पत्नीचे अखेरचे दर्शन

मुंबई : मालाडमध्ये रविवारी रात्री झालेल्या भीषण रस्ता अपघाताने एका कुटुंबावर मोठा आघात केला. या अपघातात ३४